कोल्हापुरात दिवसभरात 17 नवे कोरोनाबाधित 

शिवाजी यादव 
Thursday, 21 January 2021

जिल्हाभरात 14 कोरोनाबाधित गंभीर अवस्थेत आहेत.

कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या 24 तासात नवे 17 कोरोनाबाधित तर 22 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 97 झाली आहे. 

दहा दिवसांत दररोज दहापेक्षा अधिक संख्येने बाधित सापडत आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण दहाच्या आतच आहे. त्यात आज वाढ होऊन एका दिवशी 22 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. परिणामी बाधित उपचारार्थींची संख्या 97 आहे. खबरदारीचा भाग म्हणून बहुतेक तालुकास्तरीय कोवीड सेंटरवर अद्यापि स्वॅब तपासणी सुरू आहे. येथे आज दिवसभरात 140 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. 

दरम्यान, जिल्हाभरात 14 कोरोनाबाधित गंभीर अवस्थेत आहेत. यातील 12 व्यक्ती व्हेन्टीलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. 

  
एकूण कोरोना बाधित ः 49 हजार 810 
कोरोना मुक्त ः 47 हजार 998 
कोरोना मृत्यू ः 1 हजार 715 
उपचार घेणारे ः 97 

  
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur corona cases today update