
कोरोनाबाधितांची संख्या गेल्या दहा दिवसात अनेकदा वाढली होती
कोल्हापूर - गेल्या दहा दिवसापासून सतत वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या आज कमी झाली आहे. गेल्या 24 तासात 6 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 26 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधितांची संख्या गेल्या दहा दिवसात अनेकदा वाढली होती, त्यामुळे जिल्हाभरातील सर्व कोवीड सेंटरवर मिळून शंभर पेक्षा अधिक व्यक्ती कोरोनाबाधित म्हणून उपचार घेत होत्या आज एका दिवसात नवे बाधित कमी सापडले तर कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढून 26 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. परिणामी बाधित उपचारार्थींची संख्या 78 इतकी आहे.
खबरदारीचा भाग म्हणून बहुतेक तालुकास्तरीय कोवीड सेंटरवर अद्यापि कोरोनास्वॅब तपासणी नियमीतपणे सुरू आहे. येथे आज दिवसभरात 98 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. दरम्यान 68 वर्षीय पुरूष व्यक्तीचा एका खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. त्यांना फुप्फुसाचा संसर्ग व अन्य गुंतागुंतीचे आजार होते. अशी माहिती वैद्यकीय सुत्रांकडून देण्यात आली.
हे पण वाचा - मंगलकार्यालयातून सहा तोळ्याचा सोन्याचा हार लंपास
एकूण कोरोना बाधित ः 49 हजार 840
कोरोना मुक्त ः 47 हजार 046
कोरोना मृत्यू ः 1 हजार 716
उपचार घेणारे ः 78
संपादन - धनाजी सुर्वे