सहलीसाठी पैसे घेऊन पावणेनऊ लाखांना गंडा 

kolhapur crime news jaysingpur police station
kolhapur crime news jaysingpur police station

जयसिंगपूर - मुंबईस्थित एका हॉलिडेज कंपनीने भारतभर सहलीसाठी पैसे भरून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसगत झालेल्यांमध्ये शहरातील उद्योजकांसह प्रतिष्ठितांचा समावेश आहे. यातील काहींनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. फसगत झालेल्यांमध्ये सात जणांची नावे निष्पन्न झाली असून प्रत्येकी सव्वा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. शहरासह राज्यातील अनेकांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

बुकिंग एजंटांमार्फत सहलीच्या निमित्ताने पैसे घेऊन नियोजित सहल काढली जाते. मात्र काही दिवसांपासून कंपनीकडून ग्राहकांना चांगली सेवा दिली जात नाही. एजंटांमार्फत प्रतिष्ठितांकडून सहलीसाठी पैसे गोळा केले. कंपनीच्या भूलथापांना बळी पडून प्रत्येकी सव्वालाख भरले; मात्र यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीकडून ग्राहकांचे कॉल स्वीकारले जात नाहीत. मोबाईल बंद ठेवले जातात. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर यातील काहींनी आज जयसिंगपूर पोलिसांत कैफियत मांडली. यातील दोघांनी लेखी तक्रारही केली आहे. 

सात प्रतिष्ठितांचा समावेश 
फसवणूक केलेल्यांमध्ये शहरातील सात प्रतिष्ठीतांची नावे निष्पन्न झाल्याचे समजते. प्रत्येकी सव्वा लाखाप्रमाणे पावणेनऊ लाखाची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून आणखी काहींची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. 

 मुंबईतील कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याचे तक्रारदात्यांनी सांगितले आहे. याबाबत सखोल चौकशी करू. आणखी काहींची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तक्रार करावी. 
- दत्तात्रय बोरिगिड्डे, पोलिस निरीक्षक, जयसिंगपूर पोलिस ठाणे 


                 
संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com