esakal | ग्रामीण भागातील वातावरण चांगलच ; एकही कोरोनाबाधित नाहीच 

बोलून बातमी शोधा

kolhapur district no covid patient found covid 19 marathi news}


दिवसभरात शहरात 19 जण बाधित ः 14 जणांची कोरोनावर मातमुक्त 

 

 

kolhapur
ग्रामीण भागातील वातावरण चांगलच ; एकही कोरोनाबाधित नाहीच 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : दिवसभरात इचलकरंजीतील एक वगळता सर्व तालुक्‍यात एकही नवा कोरोना बाधित सापडलेला नाही तर शहरातून 17 व परजिल्ह्यातील एक असे 19 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत तर 14 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने आज दिवसभरात कोरोना नियंत्रणात राहील्याचे चित्र आहे. 


गेल्या पंधरा दिवसात शहरातून स्वॅब तपासणीला पाठविण्याचे प्रमाण वाढते होते. त्यातून शहरात बाधित येणाऱ्यांचेही प्रमाणही जास्त आहे. गेल्या दोन दिवसात स्वॅब तपासणीला जाण्याचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळे आज दिवसभरात शहरात 17 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसात सरासरी पाचशे पेक्षा जास्त संख्येने स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे अहवाल आज प्राप्त झाले मात्र इचलकरंजी वगळता सर्वच तालुक्‍यात आज एकही नवा कोरोनाबाधित सापडलेला नाही. त्यामुळे एकूण उपचार घेणाऱ्यांची संख्या आज 386 इतकीच आहे. यातील 31 व्यक्ती गंभीर आहेत त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

संख्या  एकूण
एकूण कोरोना बाधित 50 हजार 600 
कोरोना मुक्त कोरोना मुक्त
कोरोना मृत्यू 1 हजार 745
1 हजार 745 386  

संपादन- अर्चना बनगे