Kolhapur district Shiv Sena chief Vijay Devne enters Karnataka
Kolhapur district Shiv Sena chief Vijay Devne enters Karnataka

कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांचा गनिमी काव्याने कर्नाटकात प्रवेश   

म्हाकवे : कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांना ८ ते १० मार्चपर्यंत बेळगाव जिल्हा बंदी आदेश लागू करण्यात आला होता. परंतु, कर्नाटक सरकारच्या दडपशाही धोरणाविरुद्ध निषेध करण्यासाठी विजय देवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह म्हाकवेपासून जवळच असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील हदनाळ या गावी जाऊन आज (ता.८)रोजी सकाळी चौकामध्ये भगवा झेंडा फडकवला. कर्नाटक शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
  

कर्नाटक शासनाच्या या दडपशाहीविरुद्ध विजय देवणे यांनी गनिमी काव्याने आंदोलन करत कर्नाटकात प्रवेश केला.  कर्नाटक पोलिसांना हुलकावणी देत त्यांनी शेंडूर या महाराष्ट्र राज्यातील गावातून बेळगाव जिल्ह्यात असणाऱ्या हदनाळ गावात आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. चौकात जोरदार घोषणाबाजी केली. कर्नाटक शासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवत हदनाळ गावातील चौकात भगवा फडकवला. सुमारे अर्धा तास घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. जय भवानी जय शिवाजी या घोषणा देतच त्यांनी पुन्हा शेंडूरमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करत कर्नाटक शासनाच्या बंदी आदेशाला झुडाकारून दिले. 

यावेळी शिवसेना कागल तालुका प्रमुख अशोक पाटील, शिवगोंड पाटील, विकास पाटील, रामदास पाटील, बाबुराव शेवाळे, प्रभाकर हात्रोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

विजय देवणे यांनी हादनाळ येथे प्रवेश केल्याची माहिती बेळगाव पोलिसांना मिळताच बेळगाव पोलिसांचा फौजफाटा हादनाळमध्ये दाखल झाला होता. मात्र पोलिस येण्यापूर्वीच आपल्या  कार्यकर्त्यांसह विजय देवणे यांनी महाराष्ट्रात प्रवेश करून कर्नाटक शासनाच्या दडपशाहीला गमिनी काव्याने प्रत्युत्तर दिले.

 संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com