
कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा विभागाची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे
कोल्हापूर : थकित घरफाळ्यासाठी महापालिकेने आकारलेला भरमसाठ दंड आणि व्याजात सवलत देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून या महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. एक हजार चौरस फुटाच्या मिळकतधारकांना त्याचा लाभ घेता येणार असून 31 मार्चपर्यंत सवलतीचे विविध टप्पे देण्यात आल्याची माहिती महापलिका प्रशासनाच्यावतीने आज देण्यात आली. यामुळे सर्वसामान्य मिळकतधारकांच्यावर लादलेला भुर्दंडामधून कांही प्रमाणात मिळकतधारकांना दिलासा मिळळार आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा विभागाची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच थकित घरफाळ्यावर 18 टक्के व्याज आणि दंड अशी देखील आकारणी करण्यात आल्याने सर्वसामान्य मिळकतधारकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे दंड आणि व्याजात सवलत देण्याची मागणी वारंवार केली जात होती. या पार्श्वभूमीवर आज महापालिका प्रशासनाने दंड आणि व्याजात सवलत देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी या महिन्यापासून केली जाणार आहे.
दंड आणि व्याजात अशी मिळणार सवलत
1 हजार स्केअर फूटाच्या आतील मिळकत धारकांना दंडच्या व्याजामध्ये 31 जानेवारीपर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात 70 टक्के, 28 फेब्रुवारीपर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात 60 टक्के व 31 मार्च पर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. 1 हजार स्केअर फूटाच्या वरील मिळकत धारकांना दंडच्या व्याजामध्ये 31 जानेवारीपर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात 50 टक्के, 28 फेब्रुवारीपर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात 40 टक्के व 31 मार्च पर्यंत घरफाळा भरल्यास दंड व्याजात 30 टक्के सवलत दिली जाणार आहे. व्यापारी मिळकतीबाबत पुढील काही दिवसात निर्णय घेतला जाईल. दंड व्याजावरील माफी ही येथून पुढे दिली जाणार नाही यावर्षी ही शेवटची संधी असलेचे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
हे पण वाचा - हसता खेळता पोरगा रात्री झोपला अन् सकाळी उठताना तो बेशुध्द होता
संपादन - धनाजी सुर्वे