
पाच वर्षे ज्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात येणार आहे, तो उमेदवार सत्शील व सद्वर्तनी असावा, अशी अपेक्षा नक्कीच आहे.
कोल्हापूर : कोणताही नगरसेवक निवडताना नागरिक त्याच्यासाठी स्वतःचे असे निकष लावत असतात. हे निकष अगदी विविध प्रकारचे असतात. पाच वर्षे ज्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात येणार आहे, तो उमेदवार सत्शील व सद्वर्तनी असावा, अशी अपेक्षा नक्कीच आहे. प्रश्नावलीमध्ये सध्याच्या परिस्थितीत कोणते निकष पाहून नगरसेवक निवडण्यास प्राधान्य देणार, असे विचारले असता, उमेदवाराचे चारित्र्य, सार्वजनिक जीवनातील त्याची वर्तणूक व अनुभव, तसेच पक्ष पाहणार असल्याचे मत अनेकांनी नोंदवले आहे.
जात, धर्म याला नागरिकांनी नाकारले आहे. ६१.९ टक्के नागरिकांनी चारित्र्यवान उमेदवारालाच मत देणार असल्याचे अगदी आवर्जून नोंदवलेले आहे. उमेदवाराला सार्वजनिक कामाचा किती अनुभव आहे, हे पाहून मतदान करणार असल्याचे मतही ६७ टक्के नागरिकांनी व्यक्त केले. ४७.४ टक्के नागरिकांनी उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे हे पाहून मतदान करणार असल्याचे मत नोंदवले. तर ३ टक्के नागरिकांनी याबाबत कोणतेही मत नोंदवलेले नाही.
संपादन- अर्चना बनगे