कल कोल्हापूर महापालिकेचा :सत्ताधाऱ्यांचे काम समाधानकारक; विरोधकांचीही कामगिरी बरी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीबद्दल नागरिकांना विचारले असता ५८.४ टक्के नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोल्हापूर : महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीबद्दल नागरिकांना विचारले असता ५८.४ टक्के नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ३१.९ टक्के नागरिकांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. ९.७ टक्के नागरिकांनी एकूण कारभाराबद्दल निश्‍चित मत व्यक्त करता येत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. 

विरोधी पक्षाचे काम सत्ताधारी नागरिकांच्या हिताचे काम करतात की नाही हे पाहणे व त्यावर अंकुश ठेवणे. विरोधी पक्षाच्या कामाचे मूल्यमापन कसे करता? असे नागरिकांना विचारले असता, विरोधी पक्षाच्या कामगिरीबाबत २०.३ टक्के नागरिकांनी कामगिरी उत्तम असल्याचे म्हटले आहे. ४८.५ टक्के नागरिकांनी कामगिरी बरी असल्याचे म्हटले आहे. तर ३१.३ टक्के मतदारांनी विरोधी पक्षाच्या कामगिरीबाबत असमाधान व्यक्त केले आहे. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur municipal corporation issues are important to citizens survey election 2021 by daily sakal

Tags
टॉपिकस
Topic Tags: