
महापालिकेत नागरिकांमधून निवडून गेलेले सदस्य आणि प्रशासन यांच्यामध्ये नेहमीच एक छुपा संघर्ष असतो.
कोल्हापूर : महापालिकेत नागरिकांमधून निवडून गेलेले सदस्य आणि प्रशासन यांच्यामध्ये नेहमीच एक छुपा संघर्ष असतो. अनेकदा सदस्य व प्रशासन मिळून चांगले निर्णय घेत असतात. प्रशासनाच्या पातळीवर नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात; मात्र प्रशासन म्हणजेच काही अधिकारी हे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. ७३.४ टक्के नागरिकांनी महापालिका नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरली असल्याचे मत व्यक्त केले आहे, तर १४.१ टक्के नागरिकांनी महापालिकेने प्रश्न सोडवले असल्याचे मत नोंदवले आहे. १२.५ टक्के नागरिकांचे याबाबत कोणतेही मत नाही.
महापालिकेत नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसून त्याला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे मत ५६.२ टक्के नागरिकांनी मांडलेले आहे. २८.३ टक्के नागरिक त्याला नगरसेवकांना जबाबदार धरत आहेत. २१.२ टक्के नागरिकांच्या मते राजकीय पक्ष उदासीन असल्यामुळेच प्रश्नांची सोडवणूक होत नाही. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक न होण्याला प्रशासन, नगरसेवक आणि राजकीय पक्ष हे सर्वच जबाबदार असून हे सामूहिक अपयश आहे, असे ४६.६ टक्के नागरिकांना वाटते.
संपादन- अर्चना बनगे