कोल्हापूर महापालिकेचे क्‍लिन डर्टी स्पॉट अभियान

 Kolhapur Municipal Corporation's Clean Dirty Spot Campaign
Kolhapur Municipal Corporation's Clean Dirty Spot Campaign

कोल्हापूर  : शहर स्वच्छतेसाठी मिशन क्‍लिन डर्टी स्पॉट हे अभियान अधिक गतीमान करुन व्यापक स्वरुपात राबवा, अशी सुचना महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी आज येथे बोलताना केली. 
शहरातील डर्टी स्पॉट सुशोभिकरणासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी स्थायी समिती सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत अध्यक्षपदावरुन महापौर सौ.निलोफर आजरेकर बोलत होत्या. बैठकीस उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, नगरसेवक अशोक जाधव, उपायुक्त निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, आश्‍पाक आजरेकर उपस्थित होते. 

शहरातील डर्टी स्पॉट स्वच्छ व सुशोभित करण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रेरणेने महापालिकेतर्फे मिशन क्‍लिन डर्टी स्पॉट हे अभियान राबविण्यात येत आहे. शहर अधिक स्वच्छ सुंदर आरोग्यदायी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असलेचे सांगून महापौर सौ.निलोफर आजरेकर म्हणाल्या ""शहरात काही ठिकाणी डर्टी स्पॉट असल्यास आणि आढळून आल्यास नागरीकांनी त्याचा एक फोटो काढून महापौर कोल्हापूर यांच्या व्हॉट्‌सऍप क्रमांक 9860731555 किंवा मेयर ऑफ कोल्हापूर या फेसबुक पेजला कळविल्यास त्यानुसार तात्काळ कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 
उपमहापौर संजय मोहिते म्हणाले ""शहरातील मुख्य रस्ते व रस्ता दुभाजकामध्ये वाढलेले झाडी झुडपे, कचरा वेळीच काढण्याचाही कार्यक्रम निश्‍चित करा.'' 
स्थायी समिती सभापती सचिन पाटील म्हणाले, ""ड्रेनेज पाईप लाईन, चॅनेल स्वच्छ करण्यावर भर द्यावा. आवश्‍यकतेनुसार जेट मशीन उपलब्ध करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवा.'' 
नगरसेवक अशोक जाधव, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, कार्यशाळा प्रमुख चेतन शिंदे, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, एन. एस. पाटील उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com