Video - लाखमोलाचा जीव धोक्यात घालून कोल्हापूरकरांचा सुरू आहे जीवघेणा उलटा प्रवास  

kolhapur people travelling on wrong side
kolhapur people travelling on wrong side

कोल्हापूर - कावळा नाका ते धैर्यप्रसाद मंगल कार्यालय  मार्गावर नेहमीच वर्दळ असते. मोटारी सुसाट असतात. येथे काही छेद रस्ते आहेत. त्यामुळे काही दुचाकीस्वार या मार्गावरून उलट दिशेने येतात. त्यामुळे नेहमीच तेथे अपघात होतात. असाच अपघात शनिवारी सकाळी झाला. दुचाकीस्वार धैर्यप्रसाद चौकाकडून उलट दिशेने कावळा नाकाच्या बाजूने जात होता. यावेळी कावळानाक्‍याकडून येणाऱ्या मोटारीची धडक बसली. त्यात एक ठार तर दोघे जखमी झाले. उलट दिशेने येणाऱ्या वाहनामुळे किती भयानक अपघात होऊ शकतो, त्याची दृश्‍ये या फुटेज मध्ये दिसून येतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्वाचे असते हे अधोरेखित होते. 

नियम पाळायचे नाहीच
उलट दिशेने गेल्यामुळे ज्या ठिकाणी अपघात होऊन एकजण ठार झाला. या घटनास्थळावर अपघातातील  मोटार अद्याप उचलली नाही. तरीही आजही काही दुचाकीस्वार उलट दिशेने मोबाईलवर बोलत जात असल्याचेही दिसून आले. त्याचे चित्रीकरणही केले. नियम पाळायचेच नाहीच, असेच काहींनी ठरविल्याचे चित्र आज दिसून आले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा अनोखा सत्कार 
  एकीकडे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे मात्र त्यातून काहीच बोध न घेता अनेक वाहनचालक शिस्त पाळत नाहीत. अशा वाहनचालकांचा अनोखा सत्कार करून त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न येथील वाचनकट्टा बहुद्देशीय संस्थेने केला. ताराबाई पार्कात दोनच दिवसांपूर्वी विरुद्ध दिशेने वाहन चालवताना झालेल्या भीषण अपघातात एका पित्याचा दुर्दैवी अंत झाला, तर त्यांचा मुलगा व इतर दोघे गंभीररीत्या जखमी झाले. या पार्श्‍वभूमीवर संस्थेच्या माध्यमातून समविचारी सजग नागरिकांनी एकत्र येऊन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या शंभरहून अधिक वाहनचालकांचा गांधीगिरी पद्धतीने पुस्तक देऊन प्रतीकात्मक सत्कार केला. या वाहनचालकांचे प्रबोधन करून त्यांना आयुष्य किती मोलाचे आहे, याची जाणीव करून दिल्याचे संस्थेचे युवराज कदम यांनी सांगितले. यावेळी विनोद सातपुते, सुनील मोरे, करुणा कट्टी, आकाश कोतमिरे, करण खडके, अनिल देवेकर, वैभव जाधव, सचिन सातपुते, सचिन लोंढे-पाटील आदी उपस्थित होते.

पोलिसांकडून दंड वसुली गरजेची
शहरातील अनेक ठिकाणी आज ही उलट दिशेने प्रवास सुरूच आहे. काही ठिकाणी स्मार्टसीटीच्या माध्यंमातून असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे संबंधितांना नोटीस पाठविली जात आहे. तरीही उलट दिशेचा प्रवास सुरूच आहे. याबाबत ठिकठिकाणी पोलिस उभे करून जास्तीत जास्त दंड आकारणी केली पाहिजे, अशीही स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

व्हिडिओ पहा 
 

<

>


येथे होते उलट दिशेने प्रवास ः
  धैर्यप्रसाद चौक ते सदरबाजार चौक
  सरनोबतवाडी नाका ते आप्पासाहेब पवार चौक
  मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर
  सीबीएस ते राजीव गांधी पुतळा
  शिवाजी रोडवरून बिंदू चौकाकडे
  बिंदू चौक ते करवीर नगर वाचन मंदिर

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com