Kolhapur Rain Update : राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली ; कळंबा तलाव ओव्हरफ्लो

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे.

कोल्हापूर : गेल्या दोन-तीन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पुन्हा  पाण्याखाली गेला आहे.

दरम्यान, कोल्हापूर शहराचे वैभव असलेला कळंबा तलाव यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झाला असून सांडव्यावरून आज सकाळपासून पाणी वाहत आहे. शहरात ही पावसाने पाणी पाणी केले असून रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे.

या पावसामुळे लोकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा पाऊस अजुन किती दिवस पडणार याचा अंदाज नसल्याने बळीराजाच्या तोंडचे मात्र पाणी पळाले आहे.दोन दिवसाच्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.तर पंचगंगा नदीची पाणीपातळी सतरा फुट एक इंचांवर वाढली आहे. आतापर्यत जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

संपादन - अर्चना बनगे

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Rain Update kalamba dam overflow