Video - कोल्हापूरकरांनो लाॅकडाऊनमुळे रंकाळा मिस करताय! मग ही बातमी वाचा

kolhapur rankala lake video
kolhapur rankala lake video

कोल्हापूर - कोल्हापुरकरांसाठी आपुलकीचे ठिकाण तसेच पर्यटकांचेही.. रंकाळा चौपाटीवर फिरायला जाण्याचा मोह कोल्हापुरातील आबाल वृध्दांना सुटत नाही. अगदी मॉर्निंग वॉक करणारे कोल्हापुरकर मोकळ्या हवेसाठी रंकाळा चौपाटीवरच येतात. तर सायंकाळी खाउ गल्लीत भेळ चाट वडापाव पासून पावभाजीपर्यंत सर्व चमचमीत पदार्थांची रंकाळ्याच्या कट्ट्यावर बसून आस्वाद घण्यासाठी युवक युवतींचा हा हक्काचा आहे. 

कोल्हापुरकरांना आणि शहरात येणाऱ्या पर्यटकांनाही रंकाळा तलावाविषयी मोठे आकर्षण आहे. कारण रंकाळ्याचे रुपच तसे विलोभणीय असते. सायंकाळी संध्यामठ आणि शालिनी पॅलेसच्या पार्श्‍वभूतीवर सुर्यास्त पाहणेची मजा वेगळीच असते. रंकाळा तलाव पावसाळ्यात भरला की याचे रुप वेगळेच असते. तीन किलोमीटर परिसरात वर्तुळाकार पसरलेला हा रंकाळा भरला की वाऱ्यामुळे कठड्याला थडकणाऱ्या लाटांमुळे आपण समुद्र किनाऱ्यावर बसल्याचा फ़िल येतो. निळ्याशार ढगांमुळे पाण्याच्या रंगाच्या बदलणाऱ्या छटा पाहताना भान हरपून जाते. अशा रंकाळ्याचे पुुर्ण रुप एका नजरेत पाहणे ही वेगळीच अनुभूती असते. रंकाळा टॉवर आणि चौपाटी कोरोना लॉकडाउनमुळे पर्यटक आणि नागरीकांसाठी प्रतिबंधीत केली आहे.


चौपाटीवर येण्यासाठी मज्जाव असला तरी भरलेला रंकाळा पाहण्यासाठी चौपाटीवर न जाता संध्यामठ पासून पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी होत आहे. एरवी पावूस सुरु झाला की लालभडक निखाऱ्यावर भाजलेली मक्‍याची कणीस, त्यावर पेरलेले चटणी मीठाची पूड आणि मस्तपैकी लिंबूची आंबट चाटण... एका हातात धरलेली छत्री त्यात घोघावणारा वारा आणि त्यातच ही छत्री सावरत रंकाळ्याच्या कठड्यावर बसून एका हातात हे कणीस घेवून खातानाची मजा अवर्णणीय असते. यंदा  सर्वजण हे मिस करतायत पण त्यातलाच अनुभव तुम्हाला यावा आणि घरबसल्या रंकाळ्याचे हे दृश्‍य डोळ्यात साठवून घेता येईल.  

व्हिडिओ पाहा 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com