संचारबंदीत दिव्यांगांच्या मदतीला धावला समाज कल्यान विभाग

kolhapur samaj kalyan office help handicapped people
kolhapur samaj kalyan office help handicapped people

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दिव्यांगाना मदतीसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्यान विभागातर्फे "दिव्यांग सहाय्यता कक्ष' स्थापन केला आहे. संचारबंदी काळात दिव्यांगाना लागणारी जीवनावश्‍यक बाबी उपलब्ध करून देण्यास हा विभाग मदत करणार आहे. समाज कल्यान अधिकारी दिपक घाटे यांच्या अधिपत्याखाली या विभाग सुरू आहे. 

ज्या दिव्यांग व्यक्ती हालचाल करू शकत नाहीत अशांना रेशनची गरज भासल्यास अशा दिव्यांग व्यक्तींकडून आलेल्या व्यक्तीला रेशन उपलब्ध करून देण्यात येईल किंवा ज्या दिव्यांग व्यक्ती ऐकाकी आहेत अशांना घरपोच धान्य देण्यास सांगण्यात येईल तर दिव्यांग व्यक्‍ती एखाद्या दुकानात आल्यास त्यांना रांगेत जास्त वेळ थांबावे लागणार नाही, अशी सुविधा केली जाणार आहे. 

याशिवाय दिव्यांग व्यक्तींना औषधांची गरज आहे, अशा व्यक्तींना सॅनिटायझर, मास्का, डेटॉल फिनेल अशा आरोग्याची काळजी घेण्यास उपयुक्‍त ठरणाऱ्या वस्तू तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या समन्वयातून देण्यात येतील. 

कम्युनिटी किचन या उपक्रमात विविध स्वयंसेवी संस्था किंवा शासनस्तरावर कम्युनिटी किचन सुरू असल्यास तेथून दिव्यांग व्यक्तीना घरपोच अन्न सेवा देण्याविषयी हा कक्ष कळविणार आहे. 

राष्ट्रीयकृत बॅंका नागरी शहरी बॅंकेत पैसे काढणे किंवा भरण्यासाठी दिव्यांगा व्यक्तीना रांगेत थांबावे लागू नये या संबंधीही सुचना या विभागाकडून संबधीत बॅंक अधिकाऱ्यांना याकक्षाकडून केल्या जातील. 

दिव्यांग व्यक्तीला आरोग्य विषयक सेवांची गरज भासल्यास संबधीत शासकीय, निमशासकीय आरोग्य सेवांचा लाभ देण्यासाठी या विभागातून मार्गदर्शन केले जाणार आहे. 

येथे संपर्क साधला येईल 
जिल्हा परीषदेच्या समाज कल्यान विभागात दिव्यांग सहाय्यता केंद्र स्थापन केले आहे. त्यामुळे ज्या दिव्यांगाना संचारबंदी काळात आवश्‍यक त्या सुविधासाठी 0231 ः 2656445 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. या कक्षात सदानंद बगाडे, विशाल असोदे, प्रमोद भिसे, प्रकाश पाटील, रघुनाथ मेतके, योगेश घोरपडे येथे कार्यरत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com