महिला दिनाच्या कार्यक्रमानंतर नारी शक्ती एकवटली; दोन दारू अड्डे केले उध्वस्त

ऋषीकेश राऊत 
Monday, 8 March 2021

सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महिला दिनाचा कार्यक्रम आटपून संतापलेल्या महिलांनी गावठी दारूचे अड्डे उध्वस्त केले

इचलकरंजी :  महिला दिनादिवशीच महिलांनी  अब्दुललाट (ता. शिरोळ ) दोन दारू अड्डे उध्वस्त केले. गावठी दारूमुळे संसार उध्वस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने  रणरागिणी आक्रमक झाल्या. 

सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महिला दिनाचा कार्यक्रम आटपून संतापलेल्या महिलांनी गावठी दारूचे अड्डे उध्वस्त केले. अब्दुललाट मधील माळभाग व झेंडा चौकातील तळ्याशेजारील दारू अड्डा उध्वस्त करून सर्व साहित्याची जाळपोळ केली.
 

आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सायंकाळी पाच वाजता अब्दुललाट येथे श्रमशक्ती परिवार व विदयोदय मुक्तांगण परिवार यांच्यावतीने महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. झेंडा चौकजवळ असलेल्या साखर शाळेत ऊस तोडणी महिलांसाठी  हा कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम  झाल्यानंतर महिलांनी आक्रमक भूमिका  घेत गावात सुरू असणारे दोन्ही दारू अड्डे उध्वस्त केले.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur shirol women day alcohol spot