'चंद्रकांत पाटील यांच्या ग्रहणाने महाराष्ट्रात भाजप क्वारंटाईन'

kolhapur shivsena lieder ravikiran ingawale criticism on chandrakant patil
kolhapur shivsena lieder ravikiran ingawale criticism on chandrakant patil

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेच्या अनेक उमेदवारांचा पराभव केला. भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून केलेले गलीच्च्छ राजकारण महाराष्ट्रातील तमाम जनतेने पाहिले. भाजपची गद्दारी आणि राक्षसी महत्त्वकांक्षाच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यास कारणीभूत असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंदकांत पाटील यांच्या ग्रहणाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील भाजप आधीच क्वांरटाईन झाले आहे, अशी टीका शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज केली. 


एकीकडे शिवसेनेविरोधात टीका करायची आणि दुसऱ्या दिवशी सोबत येण्याची "फ्रेन्डरिक्वेस्ट' पाठवायची, अशा दुग्गल भूमिकांमुळेच श्री. पाटील यांनी महाराष्ट्रात स्वत:चे हसे करून घेतले असून, खरे वाचाळवीर कोण आहेत हे महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला सांगण्याची आवश्‍यकता नाही, असेही या पत्रकात म्हटले आहे. 

हा बाळ गुणी, सदगुणी नसता तर जनतेनी मला चार वेळा निवडून दिले नसते. प्रभागातील काना-कोपऱ्यातून मला हेरुनही जनतेच्या पाठबळावर व मी केलेल्या विकास कामामुळे जनता माझ्या पाठीशी राहते आणि उलट श्री. पाटील यांच्याजवळ असणारा एक गुणी बाळ एकदाही महानगरपालिकेत निवडून आलेला नाही, यावरून त्यांची जनतेतील पात्रता कळते. त्यामुळेच निष्कारण बदनाम करण्याचा हा धंदा भाजपने बंद करावा, असा इशाराही या पत्रकात दिला आहे. 

एखादे डॉक्‍टर जर रुग्णाची फसवणूक करत असतील त्याच्या विरुद्ध माजी आमदार राजेश क्षीरसागर हे आयुष्यभर आवाज उठविणार. रुग्ण सेवेसाठी श्री. क्षीरसागर यांनी केलेले काम आधी भाजपने तपासावे, हजारो मोफत शस्त्रक्रिया, रुग्णांचे बिल कमी करून देणे, एवढेच काय गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून त्यांनी किती रुग्णांना मदत मिळवून दिली याची माहिती अज्ञानी भाजपने घ्यावी, असेही या पत्रकात म्हटले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com