बिग बी यांच्या वाढदिवसाचे कोल्हापुरात अनोखे सेलीब्रेशन

kolhapur social media big bi amitabh bachchan birthday celebration
kolhapur social media big bi amitabh bachchan birthday celebration

कोल्हापूर : रिमझिम गिरे सावन..., मै हू डॉन..., खाईके पान बनारसवाला...अशा विविध अवीट गीतांच्या साक्षीने आज बिग बी अमिताभ बच्चन यांचा अठ्ठ्याहत्तरावा वाढदिवस कोल्हापूरकरांनीही साजरा केला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर कार्यक्रम करता येत नसल्याने सोशल मीडियावर बच्चनगीतांच्या मैफलीबरोबरच विविध डायलॉग्ज्‌नी रंगत आणली.

बच्चनवेडे कोल्हापुरी ग्रुपच्या वतीने अशा उपक्रमांसाठी पुढाकार घेतला गेला तर या ग्रुपने शहरात विविध ठिकाणी उभ्या केलेल्या "महानायक सहवास' केंद्रावरही अनेकांनी सेल्फी सेलिब्रेशन साजरे केले. बच्चनवेडे ग्रुपच्या दहा गायकांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 78 गाणी सादर केली. गरजूंना वह्या व शूज वाटप झाले. या वेळी ग्रुपचे ऍडमिन सुधर्म वाझे, राजू नांद्रे, डॉ. हर्षला वेदक, राजू बोरगावे, प्रकाश मेहता, प्राचार्य किरण पाटील, सचिन लिंग्रस, सचिन मणियार आदी उपस्थित होते. 


प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या "स्नेहसंगीतप्रतिज्ञा' उपक्रमांतर्गत आज "मुकद्दर का सिकंदर' ही बच्चनगीतांची ऑनलाईन मैफल सजली. प्रेषित शेंडगे, महेश दळवी, संगीता पाटील, शेखर आयरेकर, आनंद पाटील आदींचा स्वरसाज होता. 


दरम्यान, उजळाईवाडी येथील शकील नदाफ यांनी अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. गहू, तांदूळ, उडीद, मसूर डाळ आदी कडधान्यांचा वापर करून त्यांनी तीन बाय तीन आकाराची रांगोळी साकारली आहे. श्री. नदाफ कलाशिक्षक असून विशेष मुलांसाठी ते अध्यापनाचे काम करतात.  

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com