खेळाडूंसाठी आव्हान : सरावाला सुरवात , स्पर्धांचे वेध.... 

kolhapur sportsmen make Start practice watch competitions
kolhapur sportsmen make Start practice watch competitions

कोल्हापूर  : दोन महिन्याच्या विश्रांती नंतर नेमबाजीचा सरावाला पुन्हा सुरवात झाली . येथील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंज मध्ये उपलब्ध असणाऱ्या 10 मीटर, 25 मीटर आणि 50 मीटर च्या रेंज मध्ये हा सराव केला जात आहे. लॉकडाऊन च्या मधील सराव बंदीच्या कालावधीमध्ये झालेले नुकसान भरून काढणे हे सर्वात मोठे आव्हान खेळाडूंसाठी आहे.   

 देशातील कोरोनाचा वाढत कहर आणि तब्बल दोन महिने चाललेल्या लॉकडाऊन मुळे राज्यातीलच काय तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांचे वेळापत्रक कोलमडले. नियमित सरावाने स्पर्धा गाजवण्याची मनसुबे असणाऱ्या खेळाडूंचे भवितव्य देखील टांगणीला लागले. अश्यातच ऑलम्पिक सारख्या जागतिक स्पर्धा देखील लांबणीवर पडू लागल्यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर देखील त्याचा परिणाम होऊ लागला. मात्र दोन महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांती नंतर मैदाने हि वयक्तिक सरावासाठी सुरु होण्याचा निर्णय झाला आणि खेळाडूंच्या जीवात जीव आला.

कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल मधील शूटींग रेंज वर सरावाला सुरवात झाली आहे. या ठिकाणी 10 मीटर, 25 मीटर आणि 50 मीटर च्या रेंज आहेत. या रेंज वर सध्या राही सरनोबत, अनुष्का पाटील, अभिज्ञा पाटील, स्वरूप उन्हाळकर, अनिल पोवार हे विविध वेळांमध्ये सराव करत आहेत. पुन्हा सराव सुरु झाला असला तरीही या खेळाडूंसमोर गेल्या दोन महिन्यांमध्ये झालेले नुकसान भरून काढणे सर्वाधिक त्रासदायक असणारे आहे. मुळातच सातत्य हेच यशाचे गमक असताना हे सातत्यामध्ये पडलेला खंड हा खेळावर परिणाम करणारा आहे.हे जाणूनच या खेळाडूंनी अधिक मेहनत घेण्यास सुरवात केली आहे. नेमबाजीचा सरावासह, योगा आणि आवश्यक  असणारा  शारीरिक व्यायामावर देखील भर दिला जात आहे. सुरु झालेल्या सरावा बरोबरच लौकरच स्पर्धाना देखील सुरवात होईल अशी आशा आता खेळाडूंना आहे.  

लॉकडाऊन मध्ये नुकसान झाले असले तरीही अनेक गोष्टींचे आत्मपरीक्षण करण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे. यातूनच स्वतःच्या चुका सुधारण्याची आणि नवीन शिकण्याची संधी उपलब्ध होणे हि जमेची बाजू आहे. 

अनुष्का पाटील ( नेमबाज )

शॅडो प्रॅक्टिस आणि प्रत्यक्ष सरावामध्ये फरक असतो. इतके दिवस जरी सराव केला असला तरीही स्पर्धेच्या तयारीसाठीचा सराव हा वेगळाच असतो. लौकरच स्पर्धाना सुरवात होईल अशी अपेक्षा असून नव्या जोमाने या स्पर्धाना सामोरे जाण्याची इच्छा आहे. 

अभिज्ञा पाटील ( नेमबाज )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com