कोल्हापूरची 'ही' कन्या जिल्ह्यातील पहिलीच लोकोपायलट....

Kolhapur Tanvi Chougule First Local Pilot Kolhapur Marathi News
Kolhapur Tanvi Chougule First Local Pilot Kolhapur Marathi News

कोल्हापूर  : जगात भारी आम्ही कोल्हापुरी याची प्रचिती पुन्हा एकदा अनुभवायला आली आहे. कोल्हापूरकर कशात ही मागे नाहीत हे वडणगे येथील तन्वी चौगुले या कोल्हापूरच्या कन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे या गावची तन्वी चौगुले ही नुकतीच लोको पायलट म्हणून रूजू झाली आहे. 

रेल्वेमधून दररोज हजारो लोक प्रवास करत असतात. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत काही निर्णय घ्यावे लागतात. कधी कोणता प्रसंग ओढावेल हे सांगता येत नाही. तेव्हा मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं असतं. यासाठी वेगळी परीक्षा,चाचणी प्रशिक्षणावेळी घेतली जाते. हे सर्व प्रशिक्षण पूर्ण करून तन्वीने आता रेल्वेचं स्टेअरिंग हातात घेतलं आहे.

शेतकऱ्याची पोरगीने केले प्रशिक्षण पूर्ण

एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तन्वीने दहावीपर्यंतचे शिक्षण देवी पार्वती हायस्कूल वडणगे इथं आणि एमएलजी शाळेत घेतलं. त्यानंतर अभियांत्रिकेचे शिक्षण न्यू पॉलिटेक्निक आणि डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, आकुर्डी(पुणे) इथे पूर्ण केलं. मेकॅनिकलमध्ये असलेल्या आवडीमुळे काहीतरी वेगळं करायचं असं तिच्या मनात होतं. 

रेल्वेत लोकोपायलट म्हणून रूजू
गावातून शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर तिने पुण्यात पुढचं शिक्षण घेतलं. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि प्रशिक्षण पूर्ण करून तन्वी रेल्वेत लोकोपायलट म्हणून ती रूजू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ती पहिलीच महिला लोकोपायलट ठरली आहे. जेव्हा रेल्वेमध्ये लोकोपायलट पदाची भरती असल्याचं समजलं तेव्हा तन्वीने जोरदार तयारीला सुरुवात केली.

तन्वीच्या कामाला सुरुवात

तन्वीने लोकोपायलटसाठी अवघड असे सर्व टप्पे यशस्वीपणे पार केलं. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने बडोद्या इथं प्रशिक्षण पूर्ण केलं. सध्या तन्वी पश्चिम रेल्वेच्या बांद्रा टर्मिनसमध्ये रूजू झाली आहे. गाड्या यार्डमधून बाहेर काढणं, प्लॅटफॉर्मवर लावण्यासह तन्वीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com