कोवाडला कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर

Kowad Waste Problem in Critical condition Kolhapur Marathi News
Kowad Waste Problem in Critical condition Kolhapur Marathi News

कोवाड : येथे गावातून जमा केलेला कचरा माळरानावरील खड्ड्यातून उघड्यावर टाकला जात आहे. ओला आणि सुका असा दोन्ही प्रकारचा एकत्रीत कचरा येथे टाकला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रहिवाशांना याचा त्रास होत आहे. यातून प्लास्टिक कचरा विखुरला जात आहे. शेजारी भिमदेव मंदिर व खेळाचे मैदान आहे. वैद्यकीय कचऱ्याचाही यात समावेश असल्याने कचऱ्यातून पुन्हा प्रदूषण होत आहे. वर्षानुवर्षे टाकत असलेल्या या कचऱ्याची सुरक्षित ठिकाणी विल्हेवाट लावण्याची गरज आहे. 

गावाच्या उत्तरेला गायरान जमीन आहे. या माळरानावर भिमदेव मंदिर आहे. विजया दशमीला येथे रामाची पालखी येते. पूर्वेकडच्या बाजूला दुंडगे गावच्या गायरानात त्यांची पालखी येते. दोन्ही गावचे संपूर्ण गावकरी पालखी सोहळ्याला हजर असतात. लोकांच्या गर्दीने माळरान फुलून जातो. गावकरी भक्तीमय वातावरणात न्हाऊन जातात. सायंकाळी गाऱ्हाणी झाल्यानंतर गावकरी गावी जातात. अशा या दोन्ही गावच्या माळनारावर भक्तीचा जागर फुलत असताना कचरा डोपोची दुर्गंधी मात्र मनाला खटकणारी ठरत आहे.

मॉर्निंगवाकसाठी येणाऱ्या लोकांचीही संख्या येथे जास्त आहे. माळरानावर खेळण्यासाठी मैदान आहे. उन्हाळ्यात येथे दिवसभर खेळाडू खेळत असतात. त्यांना या कचरा डोपोचा त्रास होत आहे. गावातून घंटागाडीच्या माध्यमातून ओला आणि सुका असा संयुक्त कचरा येथील खड्ड्यातून उघड्यावर टाकला जातो. ओला कचरा कुजतो. सुका कचरा वाऱ्यामुळे उडून बाहेर पसरतो आहे. त्यातील प्लास्टिक कचरा हा नष्ट होत नाही. हे प्लास्टिक उडून जात आहे. उघड्यावर टाकलेला हा कचरा भटकी कुत्रीही विस्कटून टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी वाढत आहे.

पावसाळ्यात या माळरानावर दुंडगे व कोवाड गावातील शेतकरी जनावरे चारायला घेऊन येतात. माळरानावरील लुसलुसीत चाऱ्यावर ताव मारताना जनावरांना प्लास्टिकचाही सामना करावा लागतो आहे. काही जनावरे या कचरा डोपोत जातात. त्यामुळे उघड्या कचऱ्याचा जनावरांना धोका निर्माण होत आहे. त्यासाठी कचरा जमा करताना ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याची गरज आहे. तसेच उघड्यावर टाकत असलेल्या कचरा बंद करून त्याचे नियोजन करून योग्य विल्हेवाट करण्याची गरज आहे. 

प्लास्टिकचे वाढते प्रमाण..... 
प्लास्टिक बंदी असली तरी येथील कचरा डेपोतील प्लास्टिकचे प्रमाण पाहिले, तर अजूनही या मोहिमेला या भागात यश आलेले नाही. प्लास्टिक कचऱ्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. जिल्हा प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेतल्यास नक्कीच प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com