कोवाडच्या तरूणींची सैन्य भरतीसीठी धडपड

Kowad's Girls Struggle For Army Recruitment Kolhapur Marathi News
Kowad's Girls Struggle For Army Recruitment Kolhapur Marathi News

कोवाड : कोवाड परिसरातील 26 तरूणी विविध भरतीचा सराव करत आहेत. ग्रामीण भागातील या तरूणींनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर देश सेवेचे स्वप्न बाळगले आहे. आई-वडिलांना घरकाम व शेतीच्या कामात मदत करत सैन्य व पोलिस भरतीचा मार्ग निवडला आहे. सरावासाठी कोणत्याही सुविधा नसताना उघड्या माळावर व रस्त्यावर धावणे, उड्या मारणे, झाडांच्या फांद्याना पुल-अप्स मारणे, असे व्यायाम करत त्यांचा सराव सुरू आहे. 

कोवाड, किणी, नागरदळे, तेऊरवाडी, राजगोळी, दुंडगे, मलतवाडी, तुर्केवाडी व बागिलगे येथील या तरुणी आहेत. दर रविवारी किणी येथील माळरानावर त्या सरावासाठी एकत्र येतात. तीन तास सराव करून त्या प्रत्येकाच्या सराव पध्दतीवर चर्चा करतात. आहारावरही त्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. इतर दिवशी आपापल्या गावी सकाळी व संध्याकाळी त्या सराव करतात.

सर्वच मुली उच्च शिक्षण घेत आहेत. यातच आई-वडिलांना घरकाम व शेतीच्या कामात मदत करत आहेत. कष्टाची कामे करत सकाळी व संध्याकाळी त्यांनी व्यायामात सातत्य ठेवले आहे. या तरुणींची सुसज्ज मैदानाची मागणी नाही किंवा व्यायाम साहित्याची मागणी नाही. सद्य परिस्थितीत त्यांनी सरावासाठी स्वतःच मार्ग शोधले आहेत. केवळ आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या सराव करत आहेत. 

भौतिक सुविधा, प्रशिक्षणाची गरज 
चंदगड तालुक्‍यात विविध भरतीसाठी प्रयत्न करणारे अनेक तरूण-तरुणी आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. सुसज्ज मैदाने, व्यायाम साहित्यांचीही उणीव आहे. पण, त्यातूनही मार्ग काढत ते स्वबळावर प्रयत्न करताना दिसतात. त्यांना भौतिक सुविधा व उच्च दर्जाचे प्रशिक्षण लाभले, तर नक्कीच देश सेवेचे ध्येय बाळगलेल्या या तरुण व तरुणींची स्वप्नपुर्ती होईल. 

सरावात सातत्य
कॉलेज करत आम्ही 26 मुली भरतीसाठी प्रयत्न करत आहोत. दररोज सराव सुरू आहे. पोलिस किंवा सैन्य भरतीसाठी आमचे प्रयत्न आहेत. सरावासाठी लागणारी साधने आमच्याकडे नाहीत. पण आम्ही त्याला फारसे महत्त्व दिले नाही. आपापल्या परीने आम्ही प्राप्त परिस्थीतीत सरावात सातत्य ठेवले आहे. 
- सुजाता रेडेकर, विद्यार्थीनी 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com