नृसिंहवाडीत शुक्रवारपासून कृष्णावेणी उत्सवास प्रारंभ 

Krishnaveni festival starts from Friday in Nrusinhawadi kolhapur marathi news
Krishnaveni festival starts from Friday in Nrusinhawadi kolhapur marathi news

नृसिंहवाडी  (कोल्हापूर) : येथे शुक्रवारपासून (ता. 19) कृष्णावेणी उत्सवास प्रारंभ होणार आहे. हा सोहळा 28 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. येथील दत्त मंदिर परिसरात दहा दिवस हा सोहळा होणार असून यावेळी दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. 


सकाळी 7 वाजता पूजा, 8 वाजता ऋक्‌संहिता, ब्राह्मण- आरण्यक्‌, श्री गुरूचरित्र, कृष्ण महात्म्य, श्रीमद्‌ भागवत, श्रीसूक्त, रूद्रैकादशिनी, सप्तशती पारायणे होणार आहेत. दुपारी 1 वाजता आरती होऊन 3 ते 4 या वेळेत एकवीरा भगिनी मंडळांचे श्रीकृष्ण लहरी पठण होणार आहे. तसेच सायंकाळी 4 ते 5 या वेळेत वेदमुर्ती हरिपुजारी चोपदार यांचे श्रीकृष्ण लहरी पुराण होईल. रात्री 8 वाजता आरती व मंत्रपुष्प होऊन दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता होईल. 


कृष्णावेणी माता उत्सवाच्या निमित्ताने संयोजकांनी दत्त मंदिर परिसरात सभा मंडप उभारून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये शास्त्रीय गायन, नाट्य व भक्ती गीत गायन, किर्तन, सतार वादन, कथ्थक नृत्य, मंत्र जागर, प्रवचन, आशीर्वचन आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. यासाठी वैष्णवी जोशी (रत्नागिरी), विवेकबुवा गोखले (नृसिंहवाडी), मोहसीनखान (धारवाड), लक्ष्मीप्रसाद पटवारी (माजलगाव), प्रिया देशपांडे (कोल्हापूर), किमया लोवलेकर (रत्नागिरी), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर (औरंगाबाद), विवेक शास्त्री गोडबोले (सातारा), रूपेश गवस (गोवा), हेमंत पेडसे (पुणे), सौ. धनश्री कुलकर्णी (पुणे), शरदबुवा घाग (नृसिंहवाडी) आदी उत्सव काळात आपली कला सादर करतील. शुक्रवार (ता.26) रोजी रात्री 8 वाजता करवीर पीठाचे जगद्‌गुरू शंकराचार्य यांचे आशिर्वचन हे होईल. 


 संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com