कुस्ती - मल्लविद्या महासंघाचा कोल्हापुरात राज्यव्यापी महामेळावा

kusti mallvidya mahasangh state wide convention organized in Kolhapur
kusti mallvidya mahasangh state wide convention organized in Kolhapur
कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य कुस्ती - मल्लविद्या महासंघाचा राज्यव्यापी महामेळावा कोल्हापूर येथे रविवार (दि.३१ जानेवारी) ला आयोजित केला गेला आहे.यावेळी महासंघाच्या गेल्या दहा वर्षातील कामाचा आढावा व संघटनेच्या बांधणीवर चर्चा होणार आहे.तसेच महाराष्ट्रातील जुन्या काळातील नामवंत वस्ताद व पैलवान यांना यावेळी पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश मानुगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या मेळाव्यास प्रमुख अतिथी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अर्जुनवीर पुरस्कार विजेते काका पवार,स्वागताध्यक्ष म्हणुन आंतराराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे (पोलिस उपअधिक्षक) तसेच महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील दिग्गज पैलवान,वस्ताद मंडळी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत. रविवारी दुपारी ११ वाजता श्री. दत्त समर्थ सांस्कृतिक हॉल,आंबेवाडी येथे या मेळाव्याचे आयोजन केले गेले असुन मल्ल व वस्ताद मंडळीनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन गणेश मानुगडे यांनी केले आहे.यावेळी राज्य प्रवक्ते संग्राम कांबळे,शहर अध्यक्ष बाबा महाडीक,डाॅ.प्रकाश पोवार,नारायण गाडगीळ आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी,हिंदकेसरी मल्लांची मांदियाळी...
महाराष्ट्रातील नावाजलेले मल्ल या महा मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे.या मध्ये तब्बल सात महाराष्ट्र केसरी,तीन हिंदकेसरी,कुस्ती सम्राट,सेना केसरी तसेच ऑलिंपिकवीर पुरस्काराने सन्मानित मल्ल या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com