प्रेमाचा खरा अर्थ जाणून घ्या..! 

Learn the true meaning of love ..!
Learn the true meaning of love ..!

कोल्हापूर : "तिने' "त्याला' प्रेमासाठी नकार दिला म्हणून त्याला जगणेच नकोसे झाले तर त्याने, तिची अचानक साथ सोडली म्हणून तिलाही जगणे नकोसे झाले, आता सारं संपलच अशा टोकाच्या विचारात एका क्षणी "तिने' तर कधी "त्याने' जीवन संपविण्याचा प्रयत्न केला, अशी वाढती प्रकरणे शासकीय रूग्णालयात येत आहेत. येथील समुपदेशनानंतर बरी होताच, आपण आपल्या कृत्यावर हसतांना इतरांनाही सावध करीत आहेत. वेड्या प्रेमापेक्षा डोळस प्रेमाचा अर्थही जाणून घेत आहेत. 

त्याचीच प्रचिती देणारे एका प्रकरणात ते दोघेही एकाच गावात राहणारे, त्याला ती आवडू लागली. आपल्या मनातील भावना त्याने तिच्यासमोर व्यक्तही केल्या. तिने नकार दिला. मात्र, त्याला हे सहन झाले नाही. त्याने विष घेतले. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. त्याला बरे वाटू लागल्यानंतर त्याच्या आईने तडक तिचे घर गाठले. "तुझ्यामुळे माझ्या मुलाने विष घेतले', असे म्हणत रागावू लागली. तिच्या घरच्यांनीही परिस्थिती सांभाळली पण झालेल्या बदनामीने "ती' खचली. तिनेही विष घेऊन आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला. 

या दोघांनाही सीपीआरमध्ये आणले, उपचार झाले, त्यासोबत सीपीआरच्या मानसोपचार विभागात मानसोपचार तज्ज्ञांव्दारे दोघांचे समुपदेशन केले. या दोघांचेही नशीब बलवत्तर म्हणून या सगळ्यातून ते बाहेर पडले. पण आज आजुबाजुला असे अनेकजण आहेत. ज्यांना नैराश्‍याने ग्रासले आहे. तीने नकार दिला म्हणून स्वतःचे आयुष्य संपविण्याचा निर्णय काहीवेळा घेतला जातो. 

पालकांची भूमिका महत्वाची 
पालक आणि पाल्यांमधील संवादाची दरी ही खरी समस्या आहे. पाल्य कोणत्या समस्यांना सामोरा जातो ? याची माहिती पालकांनी असली पाहिजे. त्याशिवाय इतर कौंटुबिक मतभेदापासून पाल्याला लांब ठेवले पाहिजे. काही पालक पाल्यांना वास्तवांपासून दूर ठेवतात. ही मुले अभासी जगाला वास्तव समजून वागतात. असे न करता वेळोवेळी वास्तवाची ओळख पाल्याला करून देणे गरजेचे आहे. 

आपल्या मनासारखे घडले नाही, की विरोध करणे किंवा काही टोकाची पावले उचलणे हा मानवी स्वभाव आहे. यावर उपाय म्हणजे मानसीक प्रतिकारशक्ती वाढवणे. प्रेमभंगामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. अशावेळी अपयश पचविण्याची ताकदही असली पाहीजे. 
- माहेश्‍वरी पुजारी, समुपदेशिका, मानसोपचार विभाग, सीपीआर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com