विधानसभेची वर्षपूर्ती ः आठ आमदारांना घरी बसवलेला निकाल

 Financial assistance of Rs 59.26 crore to ST

कोल्हापूर ः राज्यात भाजप-सेना युतीची सत्ता, लोकसभेत आघाडीचे झालेले पानिपत, जिल्ह्यात युतीचे तब्बल आठ आमदार, कॉंग्रेसमध्ये मरगळ तर राष्ट्रवादीत आहे त्या जागा राखण्याचे आव्हान, अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच तब्बल आठ विद्यमान आमदारांना घरी बसवणारा निकाल जिल्ह्यातील जनतेने दिला. त्यातही युतीच्या आठपैकी तब्बल सात आमदारांचा पराभव, हेही एक या निकालाचे वैशिष्ट्य. विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उद्या (ता. 24) वर्षपूर्ती होत असताना राज्यात सर्वाधिक आमदार असूनही भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वी कॉंग्रेसचा आणि त्यानंतर दोन्ही कॉंग्रेसचा बालेकिल्ला, अशी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख. 2014 च्या निवडणुकीत मात्र याला छेद देण्याचे काम भाजप-सेना युतीने केले. या निवडणुकीत कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. चांगली कामे करूनही विद्यमान गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. राष्ट्रवादीने कशाबशा दोन जागा जिंकत आपले स्थान बळकट ठेवले. त्याच वेळी जिल्ह्यातील दहापैकी तब्बल आठ जागांवर शिवसेना व भाजपने विजय मिळवला. त्यातही शिवसेनेला जिल्ह्याने तब्बल सहा आमदारही दिले. ऐतिहासिक निकालाची नोंद 2014 च्या निवडणुकीत झाली. 

पण 2019 च्या निवडणुकीत राज्यात सत्ता आणि निवडणुकीत भाजप-सेना युती असूनही आहे त्या जागा राखण्यात युतीला अपयश आले. तत्पूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीअंतर्गत राजकारणामुळे जिल्ह्यातील दोन्ही जागांवर शिवसेनेने विजय मिळवला. हीच परंपरा विधानसभेतही कायम राहील, अशी शक्‍यता असतानाच युतीचा तर धुव्वा उडालाच; पण कॉंग्रेसने मात्र फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत तब्बल चार जागा जिंकत जिल्ह्यात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून ओळख निर्माण केली. भाजपला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात दोन जागाही राखता आल्या नाहीत आणि शिवसेनेलाही युतीच्या अंतर्गत राजकारणातून सहापैकी पाच जागा गमावण्याची वेळ आली. राष्ट्रवादीने मात्र या निवडणुकीत कागल, चंदगडच्या आहे त्या जागा जिंकताना दोन मतदारसंघातील आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले. या निवडणुकीत युतीतील बेबनाव भाजप-सेनेच्या उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरला. त्याच वेळी दोन्ही कॉंग्रेसमधील एकी आघाडीला तब्बल सहा जागा जिंकण्यात यशस्वी ठरली. 
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कॉंग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरून आपली ताकद मतदारसंघात दाखवली. "जनसुराज्य'चे संस्थापक डॉ. विनय कोरे यांनीही शाहूवाडीचे मैदान मारताना आपणच या मतदारसंघाचे "किंग' असल्याचे सिद्ध केले. 
राज्यात युतीचीच सत्ता येईल, असे चित्र असल्याने श्री. यड्रावकर यांनी निकालानंतर शिवसेनेला तर श्री. आवाडे व श्री. कोरे यांनी भाजपला पाठिंबा दिला. पण ऐन वेळी चित्र बदलले आणि राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आले. त्यात श्री. यड्रावकर यांनी बाजी मारत मंत्रिपद मिळवले तर मंत्रिपदाच्या आशेने भाजपला पाठिंबा दिलेल्या श्री. आवाडे व श्री. कोरे यांचा भ्रमनिरास झाला. सत्तेच्या धुंदीत हवेत असलेल्या नेत्यांना जमिनीवर आणण्याचे काम 2019 च्या निकालाने केले एवढे निश्‍चित. 

कोरोनात झाकोळली आमदारकी 
विधानसभेचा निकाल 24 ऑक्‍टोबरला लागला; पण राज्यात सरकार सत्तेवर यायला डिसेंबर महिना उजाडला. त्यानंतर कशीबशी कामाला सुरुवात होते, तोपर्यंत मार्च 2020 पासून कोरोनाचे संकट राज्यावर आले. गेले सात महिने राज्य सरकार कोरोनाशी लढत असताना आमदारही त्यात सक्रिय आहेत. त्यामुळे आमदारांची पहिल्या वर्षाची कामगिरी कोरोनात झाकोळली गेली. 
........... 
दृष्टिक्षेपात निकाल 
मतदारसंघ 2014 चे आमदार पक्ष 2019 चे आमदार पक्ष 
करवीर चंद्रदीप नरके शिवसेना पी. एन. पाटील कॉंग्रेस 
कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक भाजप ऋतुराज पाटील कॉंग्रेस 
कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर शिवसेना चंद्रकांत जाधव कॉंग्रेस 
शाहूवाडी सत्यजित पाटील शिवसेना डॉ. विनय कोरे जनसुराज्य 
राधानगरी प्रकाश आबिटकर शिवसेना प्रकाश आबिटकर शिवसेना 
कागल हसन मुश्रीफ राष्ट्रवादी हसन मुश्रीफ राष्ट्रवादी 
इचलकरंजी सुरेश हाळवणकर भाजप प्रकाश आवाडे अपक्ष 
चंदगड संध्यादेवी कुपेकर राष्ट्रवादी राजेश पाटील राष्ट्रवादी 
हातकणंगले डॉ. सुजित मिणचेकर शिवसेना राजूबाबा आवळे कॉंग्रेस 
शिरोळ उल्हास पाटील शिवसेना राजेंद्र पाटील-यड्रावकर अपक्ष 
 
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com