ग्रंथालय कर्मचारी आर्थिक अडचणीत ; वर्षानुवर्षे मानधन वाढ नाही

Library staff financial difficulties problem in maharashtra
Library staff financial difficulties problem in maharashtra

कोल्हापूर - वाचनाने माणूस घडतो,ही जडणघडण करणारी केंद्रे म्हणुन महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालये उभा राहिली.वाचन संस्कृतीला हातभार लावण्याचे काम ग्रंथालये करीत आली आहे.समाजाचा वैचारिक विकास साधणारी ही चळवळ रुजावी या दृष्टीने वाचनप्रेमी ग्रंथालयांमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झाले. हे कर्मचारी वर्षांनुवर्षे झटत आहेत. मात्र, त्यांना तुटपुंज्या मानधनावर समाधान मानावे लागत आहे. त्यांची वेतनश्रेणीची मागणी अद्याप दुर्लक्षित आहे.

1967 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वजनिक ग्रंथालय कायदा विस्थापित झाला.महाराष्ट्रामध्ये 20 टक्के सार्वजनिक ग्रंथालये सुरु करण्यात आली. परंतू 53 वर्षानंतर देखील कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न सुटलेला नाही.खात्यावर थेट मानधन मिळत नाही,जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांच्या सहीचे साधे ओळखपत्र सुद्धा मिळत नाही नसल्याची खंत कर्मचारी व्यक्त करत आहेत.या वरुन ही वाचन चळवळ चालवण्यात शासन व प्रशासनास रस नसल्याचा आरोप ते करत आहेत.

अनुभव कितीही वर्षांनी वाढला तरी मानधनाची तेच...

राज्यभरात सुमारे 12 हजार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये 21 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. सरकारी अनास्थेमुळे ग्रंथालयांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने तेथील कर्मचारीही उपेक्षित आहेत. या कर्मचाऱ्यांना इतर क्षेत्रांत नियमितपणे मिळणारी वार्षिक वेतनवाढ, भविष्य निर्वाह निधी, भरपगारी मातृत्व रजा, दिवाळीचा बोनस अशा सुविधा मिळत नाहीत. कामाचा अनुभव कितीही वर्षांनी वाढला तरी मानधनाची रक्कम तीच राहते.

शासनाने गंभीर होण्याची गरज...

गत दोन वर्षात सोलापूर, कराड मध्ये कर्मचाऱ्यांची शक्तिप्रदर्शन करत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मागणी मान्य होऊनही प्रत्यक्षात अमल मात्र झालेला नाही. 'क' आणि 'ड' दर्जाच्या सार्वजनिक ग्रंथालयांतील कर्मचाऱ्यांची अवस्था अधिकच वाईट आहे.महागाई वाढत असताना मानधन किमान दहा हजार रुपयेही मिळत नसल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ग्रंथालयांची इतकी वर्षे सेवाकरूनही कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आल्याने शासनाने गंभीर होण्याची गरज आहे.

गेली 25 वर्षे मी या बौद्धिक चळवळीत काम करत आहे.तुटपुंज्या मानधनावर आम्ही राबत आहोत. शासनास ग्रंथालय चळवळीचे अस्तित्व संपवायचे आहे असंच वाटतं.ही चळवळ बरखास्त करत सदर निधी निदान शेतकरी कल्याणासाठी तरी वापरावा अशी विनंती शासनाला आहे.
- रवींद्र कामत ( ग्रंथपाल - संत ज्ञानेश्वर वाचनालय, नाधवडे - भुदरगड )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com