वन्यजीव विभागाच्या मायेला पाझर ; मृत्यूच्या दाढेतून सांबराच्या पिल्लाला जीवदान 

Life saving to Sambars puppy in kolhapur radhanagari forest
Life saving to Sambars puppy in kolhapur radhanagari forest

कोल्हापूर - एखादी व्यक्ती गंभीर आजारी किंवा जखमी झाल्यास त्याला वाचविण्यासाठी पैसा, श्रम, साधन सामुग्रीसह अनेक लोक धावाधाव करतात. अशीच धावाधाव वन्यजीव विभागाने भूतदये पोटी केली आहे. राधानगरी जंगला शेजारीच जंगली कुत्र्यांच्या हल्ल्यात अर्धमेले झालेल्या सांबराच्या पिल्लाला जीवदान देण्यात वन्यजीव विभागाच्या वन्यजीव संक्रमन व उपचार केंद्राला यश आले आहे. सांबराला वाचविण्यासाठी केलेली धावपळ भुतदयेची अनोखी झलक ठरली आहे. 

राधानगरी जंगलात हरण, सांबराचे कळप आहेत. याच एका कळपातील सांबराचे पिल्लू वाट चुकले. राऊतवाडी धबधब्याचे दिशेने आले. याच वेळी त्याच्या मागावर असलेल्या मुळात हिंसक असलेल्या जंगली कुत्र्यांच्या टोळींने या पिल्लावर हल्ला केला. पिल्लाला सहा सात ठिकाणी लचके तोडले होते. पिल्लू कोम्यात गेले. त्याची माहिती वन्यजीव विभागाला मिळताच पिल्लाला त्यांनी गाडीत घालून राधानगरी वन्यविभाग कार्यालयात आणले. त्याची माहिती कोल्हापूर प्रादेशिक वनवृत्ताचे पशू वैद्यक डॉ. संतोष वाळवेकर यांना माहिती दिली. 

नैसर्गीक वातावरणातून बाहेर आलेले सांबर बंदिस्त ठेवल्यास आणखी घाबरू शकते. तेव्हा त्याचा हृदयविकाराने मृत्यू होऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन त्या पिल्लाला नैसर्गीक वातावरणात खुले ठेवण्याचा निर्णय डॉ. वाळवेकर यांनी घेतला. पुढे उपचार सुरू केले. जखमा धवून स्वच्छ केल्या. सलाईन व औषधांचे डोस दिले. सांबराच्या पिल्लाला जंगला बाहेर व मानसांच्या सहवासात आहोत याची जाणिव होणार नाही. याची काळजी घेतली. त्यासाठी पिल्लाच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. 

वारा, पाणी, खडाकाळ जमीनी, अवती भोवती गवत अशा नैसर्गीक वातावरणात पिल्लावर उपचार केले. कुत्र्यांकडून हल्ल्यातील जखमेला ड्रेंसिग करता येत नाही म्हणून जखमा नैसर्गीक वातावरणात शास्त्रोक्त पध्दतीने वाळवल्या. अखेर चार दिवसांनी सांबर पूर्ण बरे झाले, हालचाली सुरू झाल्या. तेव्हा सांबराचे कळप असलेल्या जंगल अधिवासात या पिल्लाला वन्यजीव विभागाने सुखरूप सोडले. 

वनाधिकारी विशाल माळी, वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे, वनपाल अमित कटके, वनरक्षक महेश पाटील, बळवंत राठोड, उपचार केंद्राचे ऋषीकेश सुतार, अंजीर पारते, समर्थ हराळे, अवधूत कुलकर्णी, अस्मिता पाटील, सानिका सावंत, वंशिका कांबळे यांनी परिश्रम घेतले. 

वेळीच खबरदारी व उपचार 
डॉ. वाळवेकर म्हणाले की, " सांबराचे पिल्लू जखमी अवस्थेत सापडले. वनपाल, वनरक्षक, वन मजूरांनी तातडीने हालचालीकरून त्याला उपचारासाठी आणले. तेव्हा ते पिल्लू अक्षरक्षः मृत्यूच्या दाढेत होते. अशात त्याला नैसर्गीक अधिवास सोडून बाहेर आल्यास भितीने मृत्यू होण्याची शक्‍यता अधिक होती, त्यामुळे त्याचा नैसर्गीक अधिवास बिघडणार नाही याची काळजी घेऊन उपचार केले. त्यामुळे उपचाराला यश येऊन पिल्लास जीवदान मिळाले.'' 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com