शंभर टक्के लॉकडाउन; इचलकरंजीकर आज ठरवणार 

LOCK DOWN Ichalkaranjikar will decide today
LOCK DOWN Ichalkaranjikar will decide today

इचलकरंजी : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध व्यावसायिकांनी आपले व्यवहार पुढील काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी दुपारी एक वाजता होणार आहे. या बैठकीत शहर शंभर टक्के लॉकडाउन करण्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

इचलकरंजी शहरात दोन आठवड्यांत दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. समूह संसर्गामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील सराफी व्यावसायिकांनी 11 जुलैपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय इलेक्‍ट्रॉनिक व्यावसायिक 12 जुलैपर्यंत दुकाने बंद ठेवणार आहेत. याशिवाय अन्य काही आस्थापनांनी व्यवहार काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकांनीही कामकाज वेळेत कपात केली आहे. 

दरम्यान, शहर नियंत्रण समितीच्या कार्यपद्धतीवर शहरातून जोरदार टीका होऊ लागली आहे. ठोस निर्णय घेत नसल्यामुळे समितीच्या कामकाजाबाबत नाराजीचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर समितीची उद्या (सोमवारी) दुपारी एक वाजता बैठक होत आहे. या बैठकीत शहर 100 टक्के लॉकडाउन करण्याचा निर्णय होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी चार दुकानदारांवर गुन्हा दाखल केला आहे. तर पालिकेने पाच दुकानदारांवर पाचशे रुपयेप्रमाणे दंडात्मक कारवाई केली. मास्क न वापरल्याने 52 नागरिकांना दंड केला आहे. 

इचलकरंजीत आणखी सात जण बाधित 
इचलकरंजी : शहरात आज 7 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये दोन बॅंक कर्मचारी, एक डॉक्‍टर, एका उद्योजकासह अन्य व्यक्तींचा समावेश आहे. यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 67 वर गेली आहे. ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 57 झाली आहे. नागरी सहकारी बॅंकेतील कर्मचारी पॉझिटिव्ह आला होता. त्याच बॅंकेतील अन्य दोघे जण आज पुन्हा पॉझिटिव्ह आले. तर डॉक्‍टर व महासत्ता चौकातील उद्योजक यांचाही आज पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे.

हे सर्व चार स्वॅब पुण्याच्या खासगी प्रयोगशाळेत तपासले आहेत. तर अन्य तिघे जण कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातून आलेल्या अहवालामध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये गुरुकन्नननगर भागातील एकाच घरातील दोन व सोडगे मळा भागातील एका महिलेचा समावेश आहे. कोरोची येथील एक 37 वर्षांची महिला पॉझिटिव्ह आहे. ती अहमदनगर येथून आली आहे. भोने माळ परिसरात दवाखाना असलेल्या एका डॉक्‍टरचा अहवालही खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला आहे. 

कोल्हापूर

कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com