सोमवारी सर्व दुकाने उघडणारच? 

Maharashtra Chamber of Commerce and Agriculture design shop monday open kolhapur update marathi news
Maharashtra Chamber of Commerce and Agriculture design shop monday open kolhapur update marathi news

कोल्हापूर : सोमवार (ता.12) पासून राज्यात संपूर्ण लॉकडाऊन असले तरच दुकाने बंद राहतील अन्यथा सोमवारी सकाळी दहा वाजता राज्यातील सर्व दुकाने उघडली जातील, असा निर्णय आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड ऍग्रीकल्चर मध्ये आज रात्री आठच्या सुमारास घेण्यात आला. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि वरिष्ठ उपाध्यक्ष ललीत गांधी यांनी हा निर्णय जाहीर केला. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील चेंबरचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्हीसीद्वारे आपले मत मांडले. 

मुख्यमंत्री यांना दुकाने बंद बाबत विचार करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र त्यामध्ये त्यांनी आणखी दोन दिवसांची मागणी केली आहे. राज्यात पुढील आठवडाभर संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. मात्र सोमवारी दुकाने उघडायची की नाही याबाबत विचार करण्यासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी मागितला असल्याचे व्हीसीमध्ये सांगण्यात आले. त्यामुळे हा कालावधी न देता सोमवार पासून दुकाने उघडण्यावर व्यापारी ठाम होते. तसेच प्रत्येक जिल्ह्याला वेगळा नियम असावा, तेथील परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी सिंदुधुर्ग जिल्ह्यातून करण्यात आली.

चंद्रपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूरनेही मोठ्या ताकदीने दुकाने सुरू करण्यावर भर दिला. तसेच रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी कोविड लस घेतलेल्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, तसेच ज्या ग्राहकांनी लस घेतली आहे त्यांनाच दुकानात जाण्याची परवानगी द्यावी, असाही मुद्या काहींनी पुढे आणला. तर सोमवार, मंगळवार आणि बुधवारी दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, त्यानंतर पुढे लॉकडाऊन करावा, त्याला व्यापारी सहकार्य करतील, अशीही भूमिका काही व्यापाऱ्यांनी व्हीसी मध्ये मांडली. 

दरम्यानच उद्या मुख्यमंत्री यांच्या टास्क फोर्सची बैठक होणार असून  लॉकडाऊनचा निर्णय होणार असल्याचे काही व्यापाऱ्यांनी व्हीसीत स्पष्ट केले. यावेळी अध्यक्ष मंडलेचा यांनी उद्या सायंकाळपर्यंत निर्णय न आल्यास सोमवारी दुकाने सुरू केली जातील, असे ही स्पष्ट केले. तसेच राज्यात सोमवारपासून संपूर्ण लॉकडाऊन केल्यास त्याला महाराष्ट्र चेंबरचा पाठींबा असेल असेही मंडलेचा आणि गांधी यांनी जाहीर केले. 


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com