पर्यटकांसाठी खुशखबर: कोयनेत मिळणार आता तुम्हाला 'ही' नवी सुविधा 

Maharashtra Tourism Development Corporation Facility of Koyna Lake Resort
Maharashtra Tourism Development Corporation Facility of Koyna Lake Resort

कोल्हापूर : कोयना अभयारण्य, कोयना धरण, अवती भाोवतीच्या डोंगर रांगा, नद्याचे प्रवाह, धबधबे अशा निसर्गरम्य परिसरात वर्षभर पर्यकांची रेलचेल असते. मात्र निवास व जेवण खान्याच्या पुरेशा सोयी अभावी येथे पर्यटकांची गैरसोय होत होती. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने येथे "कोयना लेक रिझॉर्ट'ची सोय केली असून येत्या डिसेंबर महिन्यात हे रिसॉर्ट सुरू होत आहे. त्यामुळे कोयना परिसरात पर्यटकांसाठी सक्षम सोय होणार आहे. 


कोयना धरण व अभयारण्य हे देशाच्या पर्यटन नकाशावरील महत्वाची स्थाने आहेत. जैवविविधतेचा हा परिसर आहे. त्यामुळे कौटूंबीक पर्यटकांसह अभ्यासकांची याभागात वर्दळ असते. निसर्ग सौंदर्याचा विस्तार मोठा असल्याने एका वेळी संपुर्ण परिसर पाहणे मुश्‍कील होते अशात निवासांची सक्षम सुविधा नसल्याने येथे आलेले अनेक पर्यटक एक दोन दिवसात पुढे निघून जातात. वरील अडचण विचारात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे 22 खोल्यांचे रिसॉर्ट बांधले आहेत. येथे स्त्री, पुरूष पर्यटकांसाठी स्वतंत्र निवास स्थान असणार आहेत. एका वेळी 60 पर्यटकांची सोय होणार आहे. यात कॉटेज रूम्स, रेस्टोरंट, बंगलो, फॅमिली रूम अशा सुविधाही असतील. याशिवाय शाहकारी, मंसाहारी जेवण, नाष्ठ्याची सोय असणार आहे. 


पर्यटन महामंडळाची पूणे विभागात महाबळेश्‍वर, माथेरान, माळशेज घाट, पानशेत, भिमाशंकर, कार्ला येथे रिसॉर्टची सोय केली आहे. त्यापाठोपाठ कोयना येथे 7 वे रिसॉर्ट होत आहे. 
सद्याची कोरोनाची पार्श्‍वभूमी विचारात घेऊन या रिसॉर्टमध्ये सॅनिटायझर, औषध फवारणी, स्वच्छता,  तापमान मोजणे, ऑक्‍सिजन मोजणे याशिवाय गरजेनुसार डॉक्‍टरांशी संपर्क साधणे अशी व्यवस्था केली आहे. 

 कोयना लेक रिसॉर्ट मध्ये येणाऱ्या पर्यटकांना कोयना धरण, कोयना जलविद्युत प्रकल्प, नेहरू उद्यान, ओझर्डे धबधबा याशिवाय कोयना अभयारण्य आदी स्थळे पहाता येणे शक्‍य आहे. कोल्हापूर, सांगलीतील बहुतांशी पर्यटक एक दोन दिवसासाठी या परिसरात सहलीस जातात याशिवाय मुंबई, पुणेसह राज्यातील अन्य पर्यटकही येथे एक दोन मुक्काम करून पुढे निघू शकतात. अशा सर्वच पर्यटकांना कोयना परिसरात निवासाचा व जेवणाचा आस्वाद घेण्याबरोबर स्वच्छंदी पर्यटनही करता येणार आहे.
दिपक हारणे, पुणे विभागीय व्यवस्थापक

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com