महावितरणने केला विलंब, शेतकऱ्याला मिळाली भरपाई

mahavitaran delays, farmers get compensation
mahavitaran delays, farmers get compensation

वडणगे : येथील शेतकऱ्याला शेतीपंपासाठी वीज जोडणी देण्यास विलंब केल्याने महावितरणला संबंधित शेतकऱ्याला 91 हजार 700 रूपयांची भरपाई द्यावी लागली. भरपाईचा धनादेश नुकताच संबंधित शेतकऱ्याला मिळाला. येथील बाबासो लक्ष्मण जौंदाळ यांनी झाडवाट कुरणाजवळील कृषी पंपाला वीज मिळावी, यासाठी आठ नोव्हेंबर 2013 रोजी अर्ज केला होता. 

फर्म कोटेशन मिळाल्यानंतर 6 एप्रिल 2015 रोजी त्यांनी वीज जोडणीची रक्कम भरली. मात्र, वीज जोडणी वेळेवर न मिळाल्याने संबंधित शेतकऱ्याने ग्राहक तक्रार निवारण मंचकडे तक्रार केली. मंचने 26 डिसेंबर 2016 रोजी संबंधित शेतकऱ्याला तीन महिन्याच्या आत नवीन वीज जोडणीचे निर्देश महावितरणला दिले. मात्र निधीची उपलब्धता व ज्येष्ठता यादीनुसार वीज कनेक्‍शन देण्यात येईल, असे सांगून महावितरणकडून मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली. 

त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने विदयुत लोकपालकडे तक्रार करून वीज जोडणी व भरपाईची मागणी केली. विदयुत लोकपालने तीस जून 2017 रोजी आदेश देत संबंधित शेतकऱ्याला त्वरीत वीज जोडणी द्यावी, तसेच आदेशाच्या दिनांकापासून प्रत्यक्ष वीज पुरवठा करेपर्यत प्रतिदिन शंभर रूपये भरपाई देण्याचे निर्देश महावितरणला दिले. संबंधित शेतकऱ्याने वीज नियामक आयोगाकडेही गाऱ्हाणे मांडले. आयोगानेही विद्यूत लोकपालचा आदेश कायम ठेवला. दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला महावितरणने 2 जानेवारी 2020 रोजी वीज जोडणी दिली. तसेच भरपाई म्हणून 91 हजार 700 रूपयांचा धनादेश नुकताच दिला. 

शेतीपंपासाठी वीज कनेक्‍शन मिळावे, म्हणून वारंवार पाठपुरावा केला. मात्र निधी व ज्येष्ठता यादीनुसार जोडणी देवू, असे सांगितले जात होते. त्यामुळे आपल्या हक्कासाठी हा लढा दिला. विदयुत लोकपाल यांनी दिलेल्या आदेशानुसार वीज कनेक्‍शन व भरपाई मिळाली आहे. 
- बाबासो जौंदाळ, शेतकरी 


दृष्टिक्षेप 
- शेती पंपासाठी वीज कनेक्‍शनसाठी भरले होते पैसे 
- वेळेवर जोडणी न मिळाल्याने शेतकऱ्याची ग्राहक मंचकडे तक्रार 
- वीज पुरवठा करेपर्यत प्रतिदिन शंभर रूपये भरपाईचे निर्देश 
- वीज नियामक आयोगाकडूनही आदेश कायम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com