मामाच्या साथीन तोतया पोलिस उपनिरीक्षक तरुणींने अनेकांचा केला मामा

Mama's accomplice Totaya Sub-Inspector of Police killed many Mama
Mama's accomplice Totaya Sub-Inspector of Police killed many Mama

गारगोटी : तोतया पोलिस उपनिरीक्षक युवतीने राज्य गुन्हे अन्वेषण विभागामध्ये (सीआयडी) पोलिस म्हणून नोकरीस लावतो असे आमिष दाखवून लुबाडणूक केल्याप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात तिच्यासह मामावर गुन्हा दाखल झाला. प्रियांका प्रकाश चव्हाण (वय 22, गारगोटी) व तिचा मामा विठ्ठल मारुती निलवर्ण (38, निळपण) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलिसांनी सांगितले की, निळपण येथील प्रतीक्षा प्रकाश साळवी हिने फिर्याद दिली आहे. यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागात पोलिस उपनिरीक्षक असल्याचे प्रियांका चव्हाण हिने भासविले आणि पोलिस खात्यात नोकरीस लावतो म्हणून असे आमिष दाखवून 5 लाख 25 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी प्रियांकाने स्वत:ची सीआयडी इन्स्पेक्‍टर झाल्याची बतावणी केल्यानंतर शहरात तिच्या निवडीचे फलक झळकले होते. यानंतर अनेकांनी तिचा सत्कार केला होता. तिच्या भूलथापांवर लोकांचा विश्‍वास बसला होता. या माध्यमातून तिने अनेक बेरोजगार युवक-युवतींना हेरून सीआयडी विभागात नोकरी लावतो, असे सांगून प्रियांका व तिच्या मामाने लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समजते.

प्रियांका व तिचा मामा विठ्ठल याने 25 जुलैला निळपण (ता. भुदरगड) येथील प्रतीक्षा साळवीकडून दहावी, बारावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल्याच्या झेरॉक्‍स तसेच 5 लाख 25 हजार रुपये घेऊन सीआयडी विभागाचे बनावट नियुक्ती पत्र दिले. निवडीबाबत गोपनीयता पाळण्याचे सांगून हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केले. तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तक्रार दाखल केली. याप्रकरणी प्रियांका चव्हाण व तिचा मामा विठ्ठल मारुती निलवर्ण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

असा झाला उलगडा 
प्रतीक्षा साळवी हिची पोलिस खात्यात निवड झाली म्हणून भाऊ प्रथमेशला आनंद झाला. त्याने बहिणीच्या निवडीचा सोशल मीडियावर कागदपत्रांसह स्टेट्‌स लावला. पोलिसांनी हा स्टेट्‌स पाहून बोलावून घेतले. या चौकशीदरम्यान त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर बहीण प्रतीक्षा साळवी हिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. माझ्याप्रमाणेच गावातील आणखी दोघांची फसवणूक झाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com