Manchester City Ichalkaranjeet made almost a million masks ready
Manchester City Ichalkaranjeet made almost a million masks ready

मँचेस्टर नगरी इचलकरंजीत तब्बल एक लाख मास्क केले तयार... 

इचलकरंजी - महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या वस्त्रनगरीत इचलकरंजी क्लस्टर गारमेंटच्या माध्यमातून तब्बल 1 लाख मास्क आणि 1 हजार मेडिकल अ‍ॅपरल व अन्य साहित्य तयार करण्यात आले आहे. संपूर्ण मेड इन इचलकरंजी असलेले हे साहित्य प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना मोफत देण्यात आले आहे. सध्या या वस्तूसाठी शहरात मोठी मागणी असली तरी एकूणच कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कामगारांची मानसिकता आणि त्यांना कामावर येण्यासाठी येणार्‍या अडचणी अडथळ्याचे ठरत आहेत.

कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर तात्काळ इचलकरंजी गारमेंट क्लस्टरचे संस्थापक व आमदार प्रकाश आवाडे यांनी यासाठी लागणार्‍या साहित्याचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात मास्कचा तुटवडा असल्याने याच उत्पादनावर भर देण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी पूर्ण मेडिकल अ‍ॅपरनची गरज होती. मोठ्या आकारातील हे अ‍ॅपरन खास पध्दतीने तयार करण्यात आले. या अ‍ॅपरनबरोबरच मेडिकल कॅप, एन-95 मास्क आणि सर्जिकल मास्कही उपलब्ध करण्यात आले. विशेष म्हणजे हे सर्व साहित्य प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्रातील संघटना आणि पालिकेकडे मोफत सुपूर्द करण्यात आले.

सध्या अशा पध्दतीच्या उत्पादनाने मोठी मागणी आहे. उत्पादन करत असताना सर्व महिला कर्मचार्‍यांची योग्य पध्दतीने काळजी घेत त्यांच्यातील सोशल डिस्टन्सही व्यवस्थीत ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांना येण्या जाण्यासाठी खास सोय करण्यात आली होती. परंतू एकूणच यामध्ये काम करणार्‍या महिला वर्गाची विशेषत: त्यांच्या कुटुंबियांची कामावर पाठविण्याची फारशी मानसिकता नाही. त्यामुळेच उत्पादनाला मर्यादा येत असल्याचे इचलकरंजी क्लस्टर गारमेंटच्या अध्यक्षा सौ. वैशाली आवाडे व स्वप्नील आवाडे यांनी सांगितले.

असे आहे सर्जिकल साहित्य

मेड इन इचलकरंजी असलेले हे सर्जिकल उत्पादन अत्यंत गतीने तयार करण्यात आले आहे. यासाठी लागणारे कापडही इचलकरंजी येथेच उत्पादीत झालेले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार सद्या असणार्‍या मेडिकल अ‍ॅपरन शिवाय वेगळ्या पध्दतीचे हे अ‍ॅपरन तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर वॉशेबल, मेडिकल कॅपही तयार करण्यात आली आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कापड उत्पादनात अनेक गोष्टी तयार करता येणे शक्य आहे. सुरवातीच्या टप्यात आम्ही स्थानिक परिसरात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आवश्यक साहित्य मोफत पुरविले आहे. शहरातील तीन दिवस लॉकडाऊन संपल्यानंतर कामगारांची सुरक्षितपणे उपलब्धता करून उत्पादन अधिक वाढवून ते अन्यत्र देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.
 आमदार - प्रकाश आवाडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com