Photo : इचलकरंजीत त्यानंतर मात्र कोणी रस्त्यावर फिरकले नाही...

 संजय खूळ
Sunday, 22 March 2020

इचलकरंजी शहराने यापूर्वीसुद्धा साथीचे आजार अनुभवले आहेत त्यामुळे एकीतून साथीवर कशी मात करायची हे शहराने चांगले शिकले आहे.

इचलकरंजी  (कोल्हापुर) :  महाराष्ट्राची मॅंचेस्टर नगरी समजल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरातील नागरिकांनी आज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी सात वाजल्यापासून शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. विनाकारण फिरणाऱ्या  नागरिकांनी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस प्रशासनाने कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

इचलकरंजीतील जनता चौक परिसरात अशी शांतता होती

हेही वाचा-Photo : जगात भारी आम्ही कोल्हापुरी... जनता‌ कर्फ्यूला सन्नाटा...
इचलकरंजी शहराने यापूर्वीसुद्धा साथीचे आजार अनुभवले आहेत त्यामुळे एकीतून साथीवर कशी मात करायची हे शहराने चांगले शिकले आहे. आज सकाळपासूनच शहरातील सर्वच घटकांनी आजच्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिक कोणीही आज रस्त्यावर पडले नाहीत. पोलिसांनीही ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. या कालावधीत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही आजच्या या जनता कर्फ्यूला ठीक ठिकाणी सहकार्य केले.

स्टेशन रोड रस्त्यावरील चित्र

हेही वाचा- Janta curfew : भावा कुठे निघालास? काय काम आहे तुझे...?

मध्यवर्ती बस स्थानक मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आला शहरातील मुख्य बसस्थानक जनता चौक, गांधी पुतळा, राजवाडा चौक, सांगली रोड या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता कोणतेही कारण नसताना गांधी पुतळा व गावभाग परिसरात फिरणार्‍या  युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना चांगला धडा शिकवला. त्यानंतर मात्र कोणी रस्त्यावर फिरकले नाहीत. सर्वच घटकांनी आजच्या या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे सकाळी पाहावयास मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manchester city ichlkarnji but after that no one has walked the streets kolhapur marathi news