अबब ! 'या' मावळ्याने कापले दांडपट्ट्याने 4000 लिंबू...

Manly Game In Kolhapur City  Kolhapur Marathi News
Manly Game In Kolhapur City Kolhapur Marathi News

कोल्हापूर  : शांतिदुत मर्दानी आखाडा, कोल्हापूर मार्फत सादर करण्यात आलेले ४००० लिंबू दांडपट्टाच्या साहाय्याने १ तास ५८ मिनिट मध्ये कापण्याचा विक्रम यशस्वी रित्या पार पडला.मावळा गफूर मुजावर गेले ७ वर्ष आखड्याचा सुरुवातीपासून मर्दानी कलेचे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी 2007 मध्ये जोतिबा डोंगर या ठिकाणी लखन जाधव यांनी  3802 लिंबू कापण्याचा विक्रम  आहे  हा विक्रम  आज गफूर यांनी मोडला.


 गफूरची जिद्द आणि चिकाटी

 गफूरची आवड लहानपणा पासून मर्दानी कलेत राहिली. यातूनच त्याने स्वतःला या विक्रमासाठी तैयार केले आणि स्वतःला सिद्ध पण करून दाखवले. या कार्यात त्याला आई वडिलांची आखाडा मधील सर्व रणरागिणी आणि मावळे व समस्त शांतिदुत मर्दानी आखाडा मित्रपरिवार, पालकवर्ग यांची साथ लाभली. त्याबरोबर संपूर्ण मार्गदर्शन आखाड्याचे संस्थापक-अध्यक्ष  सुरज शामराव केसरकर व कार्याध्यक्ष  अतुल गणपती शिंदे यांचे लाभले.

मर्दानी खेळाला उंची लाभण्यासाठी प्रयत्न

हा विक्रम करण्यापाठीमागील उद्देश शांतिदुत मर्दानी आखड्याचा इतकाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्ध नीती लोकांना माहिती व्हावी मर्दानी खेळाला एक चांगली उंची लाभावी आणि मुलांनी इतर खेळांसोबत मर्दानी खेळाला देखील प्राधान्य द्यावे यासाठी प्रयत्न सुरू आहे.पुढील पिढीला देखील याची माहिती ,प्रशिक्षण द्यावे हा आमचा उद्देश सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न मावळा गफूर मुजावर याने केला आहे. असे प्रशिक्षक सुरज केसरकर यांनी  सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com