'छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांचा पोलिसांनी वेळीच शोध घ्यावा! अन्यथा...' 

मिलिंद देसाई
Monday, 31 August 2020

सीमाभागातील मराठी भाषिकांवर विविध प्रकारे अन्याय केला जातो.

बेळगाव : मराठी भाषिकां विरोधात नेहमीच कोल्हेकोई करणाऱ्या कन्नड संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोष्ट टाकत वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याला उत्तर देण्यासाठी येणाऱ्या काळात भव्य मोर्चा काढण्यात यावा अशी मागणी सकल मराठा समाजातून होत आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या संयोजकांची लवकरच बैठक होणार आहे. 

सीमाभागातील मराठी भाषिकांवर विविध प्रकारे अन्याय केला जातो. याबाबत सीमावाशीय शांततेच्या मार्गाने लढा देत आहेत. मात्र काही दिवसांपासून जाणीवपुर्वक मराठी भाषिकांचे खच्चीकरण करण्यासाठी शिवाजी राजांबाबत आक्षेपार्ह लिखान केले जात आहे. याबाबत रविवारी सकल मराठा समाजाच्यावतीने पोलीस आयुक्‍तांना निवेदन देऊन आक्षेपार्ह पोष्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र अजुनही त्यांचा शोध घेण्यात आलेला नाही. तसेच दरवेळी प्रमाणे पोलीसही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सकल मराठा समाजातर्फे मोर्चा काढून त्यांना ताकत दाखवून द्यावी अशी मागणी मराठी भाषिकांमधून व्यक्‍त होत आहे. 

विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चा प्रमाणेच राजांच्या अवमान प्रकरणी सकल मराठा समाजातर्फे मोर्चाचे आयोजन करावे असे मत शहरवाशीयांमधून व्यक्‍त होत असून सकल मराठा समाजाच्या संयोजकाची लवकरच बैठक घ्यावी असा विचार पुढे आला आहे. तसेच सोशल मीडियावरुनही मोर्चा काढला जावा असे मत युवा वर्गाकडून व्यक्‍त होत आहे. त्यामुळे मोर्चाबाबत लवकरच बैठक होण्याची शक्‍यता आहे. 

हे पण वाचासंकटातूनही शोधल्या संधी ;  विविध क्षेत्रांत सकारात्मक बदलांची नांदी

राजांचा अवमान करणाऱ्यांचा पोलिसांनी वेळीच शोध घ्यावा अन्यथा गणपती विसर्जनानंतर सकल मराठा समाज व शहरातील विविध संघ, संस्था व सर्व मंडळाची व्यापक बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत राजांचा अवमान सहन केला जाणार नाही. 

हे पण वाचादादा गुरवार हाय खोटं बोलत नाही,  मावशी तुम्ही बरोबर आहात, अजिबात माघार घेऊ नका

 

-प्रकाश मरगाळे, अध्यक्ष मराठा समाज सुधारणा मंडळ 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha community altimeter to belgaum police