कचरा बाहेर झाडून येते असे सांगून ती घराबाहेर पडली पण...

Married woman Disappeared in belgaum
Married woman Disappeared in belgaum

बेळगाव ; कचरा बाहेर झाडून येते असे सांगून घराबाहेर पडलेली विवाहिता घरी परतलीच नाही. त्यामुळे ती बेपत्ता झाल्याची फिर्याद रविवारी (ता. 12) शहापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पूजा परशराम जातींनकट्टी (वय 21, रा. भारतगल्ली पहिला क्रॉस खासबाग) असे तीचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, 8 जुलै ला सकाळी 6.30 च्या सुमारास ती कचरा झाडून येते असे सांगून घरातून बाहेर गेली होती. ती पुन्हा परतलीच नाही. कुटूंबियांनी सर्वत्र शोध घेऊन देखील तिचा कोठेच पत्ता लागू शकला नाही. त्यामुळे आज पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. उंची 5.5 फूट, वर्ण गव्हाळी, लांब चेहरा, कन्नड, मराठी, कोकणी भाषा तिला अवगत आहे. घरातून बाहेर पडताना तिने अंगावर हळदी रंगाचा टॉप, काळ्या रंगाची पॅन्ट, चुडीदार परिधान केला आहे. या वर्णनातील महिलेबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास शहापूर पोलीस ठाणे 08312405244 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com