मास्कने घटवले अनेक आजार ; फायदेशीर ठरतोय मास्कचा वापर

benefits of wearing mask
benefits of wearing mask

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 'मास्क' वापरणे हा एकमेव प्रभावी उपाय वापरण्यात येत आहे.गेल्या वर्ष भरापासून कोरोना पासून वाचवण्यात मास्कची भुमिका महत्त्वाची ठरली आहे.त्याच बरोबर मास्कमुळे आरोग्यकारक फायदे समोर येत आहेत.मास्क घातल्यामुळे प्रदूषणापासून बचाव होत असल्याचे पुढे आले आहे.श्वसन, फुप्फुस, छातीशी संबंधित आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने घट झाली आहे. यामुळे श्वसनविकारावर मास्क वरदान ठरत आहे.

हवेतून कोरोना पसरण्यााची भिती लक्षात घेता कोरोना प्रतिबंधासाठी मास्क वापरणे सुरू झाले. शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांपासून बचाव मास्कमुळे होतोच.पण,हवेतील प्रदूषणांपासून मास्क बऱ्यापैकी संरक्षण करू शकतो.वाहनांमधुन निघणारा कार्बनडाय ऑक्साईड, धुलीकणामुळे होणारा दमा,फुफूसांसंबंधीत तसेच श्वसन नलिकेच्या संदर्भात इतरही आजार उद्भवण्याचा धोका असतो.परंतू मास्कच्या वापरामुळे या आजारांचा धोका कमी झाला आहे.तसेच पावसाळा,हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप या संसर्गजन्य आजार नियंत्रीत राहिले आहेत.

भारतात फुप्फुसांच्या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. जगभरातील दम्याच्या रुग्णांपैकी १० ते १५  टक्के रुग्ण हे भारतातील आहेत, अशी आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने मध्यंतरी प्रसिद्ध केली होती. यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.फुफ्फुसात हवा शोषून घेण्यासाठी स्पंज असतो. या स्पंजचे काम हवेतील प्राणवायू शोषून घेणे तसेच श्वसनमार्गाचे कार्य सुरळीत ठेवणे, हे असते. मात्र, वाढत्या प्रदूषणामुळे त्यात अटकाव निर्माण होतो. काही धूलीकण अडकतात,संसर्ग होतो आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वेगाने खालावते.या समस्येवर मास्क वापरणे हा महत्त्वाचा उपाय पुढे आला आहे.

शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करणारा संरक्षक म्हणून मास्ककडे बघितले जात आहे. मात्र मास्क घातल्याने श्वसनाचे आजार जडतात, असा संभ्रम सोशल मिडीया वर सुरवातीला पसरला होता परंतू चांगल्या प्रतीच्या मास्क वापण्याचे विविध आरोग्यदायक फायदे पुढे येत आहेत.मास्कचा वापर, नियमितपणे हात धुणे आणि शारीरिक अंतर ठेवणे या त्रिसूत्रीवर भर दिला तर कोरोना पासुन माणुस दुर राहू शकतो.तसेच मास्कच्या वापरामुळे श्वसनाचा आजार ही टाळू शकतो.

मास्कचे फायदे....

  • कोरोनाचा संसर्ग रोखणेप्रदुषण
  • धुलीकणापासुन बचाव
  • दुर्गंधीपासुन बचाव
  • सार्वजनिक ठिकाणी धुकण्याची सवय मोडीत


दमा,क्षय रोग तसचे विविध ऍलर्जीचा सामना लोकांना करावा लागतो. परंतु मास्कच्या वापरामुळे या श्वसनासंबंधी रुग्णाचे प्रमाण कमी झाले आहे.सततच्या मास्क वापरामुळे अस्थमाच्या रुग्णामध्ये घट झाली आहे. 

- डॉ.अनिता सैबननावर (ऊरो रोग तत्र - सीपीआर )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com