पोलिसांची पॅन्ट, पोस्टमनचा शर्ट अन्‌ माजी सैनिकांची टोपी

Mcc cadets Suffer For Facilities Kolhapur Marathi News
Mcc cadets Suffer For Facilities Kolhapur Marathi News

उत्तूर : पोलिसांची खाकी पॅंन्ट, पोस्टमनचा खाकी शर्ट आणि वनरक्षकांची किंवा माजी सैनिकांची टोपी वापरून कवायत करायची आणि कवायत स्पर्धेत सहभागी व्हायची वेळ महाराष्ट्र छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांवर आली आहे. 25 वर्षापुर्वी शासनाने या विद्यार्थ्याना दिलेले गणवेश खराब झाले, टोपींना छिद्र पडले, बुट फाटले आहेत यामुळे विद्यार्थ्यांवर ही उसनवारीची वेळ आली आहे. 

शालेय विद्यार्थ्यांमध्ये सेनादलाविषयी आवड निर्माण व्हावी, त्याच थाटाची शिस्त त्यांच्या अंगी बाणावी या उद्देशाने महाराष्ट्र छात्र सेना (एमसीसी) राज्यात 1996 मध्ये केंद्रीय छात्र सेनेच्या धर्तीवर राज्यातील शाळेत एमसीसी युनिट सुरू करण्यात आले. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. या युनिटमध्ये सहभागी विद्यार्थ्यांची दर रविवारी परेड व्हायची, त्यांना सैनिकी पद्धतीचे प्रशिक्षण दिले जायचे. त्यासाठी प्रशिक्षक नियुक्त केले होते.

या विद्यार्थ्यांना परेडसाठी 80 रूपये भोजन भत्ता तर 15 रूपये धुलाई भत्ता देखील दिला जायचा. विद्यार्थ्याना गणवेशखाकी पॅंन्ट, शर्ट, बुट, टोपी, बॅच, बेल्ट देणेत आले होते. त्याला आता पंचवीस वर्षे झाली. मात्र नंतर एमसीसीमधील सहभाग हा ऐच्छिक करण्यात आला. त्यातील शाळांचा सहभाग देखील कमी होत गेला.

विद्यार्थी संख्या घटू लागली. या सर्वांचा परिणाम म्हणून बहुतेक शाळांमधील युनिट एकामागून एक बंद झाले. मात्र अद्यापही काही शाळांनी एमसीसी हा विषय जीवंत ठेवला आहे. विद्यार्थी परेडसाठी गणवेश, बुट व साहित्य इतंराकडून मागून आणतात व स्पर्धेत सहभागी होतात. त्यामुळे पुर्वीप्रमाणे गणवेश भत्ता शासनाने सुरू करावा, अशी मागणी होत आहे. 

गणवेश पुरवावा
शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व, खिलाडू वृत्ती, राष्ट्रीय एकात्मता अशा विविध गुणांची जोपासना होण्यासाठी शासनाने हा विषय ऐच्छिक ऐवजी सक्तीचा करावा. सहभागी कॅडेट्‌सना टोपी, लाल रंगाचे बूट, पट्टा, खाकी शर्ट-पॅन्ट असा गणवेश पुरवावा. 
- संभाजी तिबीले, क्रीडाशिक्षक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com