प्रकल्पग्रस्तांबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक 

Meeting with collectors today regarding project victims
Meeting with collectors today regarding project victims

कोल्हापूर : प्रकल्पग्रस्तांना तात्काळ जमिनी द्याव्यात. अतिरिक्त झालेल्या जमिनी परत घ्याव्यात यासह इतर मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलाला आज इरिगेशन फेडरेशन व प्रा. एन. डी. पाटील यांनी आज पाठिंबा दिली. दरम्यान, याबाबत उद्या (ता. 24) जिल्हाधिकारीक कार्यालयात बैठक घेतली जाणार आहे. 

अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या रास्त आहेत. त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इरिगेशन फेडरशन प्रकल्पग्रस्तांच्या मागे राहिल, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांसोबत राहण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती बाबासाहेब पाटील भुयेकर व विक्रांत पाटील यांनी आज दिली. इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. 

श्री भुयेकर म्हणाले, "" श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने चांदोली धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त लोकांच्या पुनर्वसन झाले पाहिजे. ज्यांच्यामुळे जिल्ह्याला पाणी मिळाले. त्यांना आंदोलनाच्याठिकाणी प्यायला पाणी नाही, हे प्रा.डॉ. एन डी पाटील यांना समजले. त्यामुळे इरिगेशन फेडरेशनच्यावतीने त्यांना पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानूसार व्यवस्था करण्यात आली आहे.'' 
विक्रांत पाटील म्हणाले, "" प्रकल्पग्रस्तांनी आपल्या प्रश्‍नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. याठिकाणी त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. त्यामुळे आंदोलन सुरुअसे पर्यंत पाणी दिले जाईल.'' 

दरम्यान, उद्या (ता. 24) लाभ क्षेत्रामध्ये लपलेल्या जमिनी, धोरणे. गायरान व मुलकीपड जमिनी वर्ग करून वाटपास उपलब्ध करून देणे. अतिरिक्त वाटप झालेल्या जमिनी परत घेणे. फॉरेस्टच्या 215 हेक्‍टर जमिन वर्ग करून वाटपास उपलब्ध करून देणे. भूसंपादनातील सर्व न्यायालयानी प्रकरणांची माहिती घेण्यावर चर्चा केली जाईल. यावेळी, श्रमिक मुक्ती दलाचे मारूती पाटील, इरिगेशन फेडरेशनचे चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, सखाराम पाटील, सुभाष शहापुरे, समीर पाटील व सचिव मारुती पाटील उपस्थित होते. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com