मानसिक आरोग्यासाठी ;सोशल मीडियाद्वारे जनजागृती

 For Mental Health; Awareness through Social Media
For Mental Health; Awareness through Social Media

कोल्हापूर : लॉकडाउनमध्ये घराबाहेर न पडता आल्याने अनेकांत मानसिक आरोग्याच्या समस्या उद्‌भवत आहेत. त्यांना चिंता, अनिश्‍चितता, निराशा, सामाजिक विलगीकरण आणि असुरक्षिततेचा सामना करणे कठीण जात आहे. अशा काळात मानसिक आरोग्यासाठी समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञांनी ऑनलाईन चळवळ उभी केली आहे. सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांवरून मानसिक आरोग्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. 


मानसिक आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या काही सामाजिक संस्थांनी यात पुढाकार घेतला आहे. फेसबुक लाईव्ह, व्हॉटस्‌ऍप ग्रुप, इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून वेबिनार, चर्चासत्र, संवादसत्रे सुरू आहेत. विशेष म्हणजे या वेबिनारला प्रतिसादही मोठा आहे. 

शारीरिक प्रतिकारशक्तीसोबत मानसिक बळ किती महत्त्वाचे आहे, याची जनजागृती या चर्चासत्रांतून होते. हे उपक्रम विविध वयोगटांसाठी निश्‍चित केले आहेत. त्यांच्या समस्या नेमकेपणाने जाणून घेऊन त्यातून त्या व्यक्तीला कसे बाहेर काढले पाहिजे, यासंबंधीची चर्चा ऑनलाईन व्यासपीठावरून होते आहे. शहरातील जुगाड कौन्सिलिंग सेंटरतर्फे ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आधार मिळावा, या हेतूने ऑनलाईन समुपदेशन सुरू आहे. ज्यांची मुले परजिल्ह्यात, परदेशात आहेत. त्यांना मानसिक आधारासोबतच मनोरंजन व्हावे, यासाठी ऑनलाईन शाळेचा उपक्रम राबविला जातो. याअंतर्गत मनोबल वाढविण्यासाठीच्या टिप्स दिल्या जातात. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाही, यात संभ्रमावस्था आहे. त्यांच्या परीक्षा जर झाल्या नाहीत, तर त्यांच्या पुढील प्रवेशाचे काय होणार, रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील का, अशा अनेक शंकांनी त्यांना घेरले. त्यांच्यात नैराश्‍य येऊ नये, सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहावी, यासाठी "हितगुज' व विवेकानंद महाविद्यालयातर्फे वेबिनार आयोजित करण्यात येत आहे. तरुणाईच्या समुपदेशनासोबत "मनोसामाजिक अडचणी, समस्या व व्यवस्थापनासंबधी' चर्चासत्रही घेतले. 


लॉकडाउनमध्ये मानसिक आजारांच्या समस्या उद्‌भवल्या. 24 तास घरी असल्याने नैराश्‍य, चिंता, नोकरीबाबत अनिश्‍चितता, आर्थिक समस्यांबाबत चिंता आदी मानसिक आजार वाढू लागले. अशांचे मानसिक बळ वाढावे यासाठी आंतरराष्ट्रीय ते महाविद्यालयीन स्तरावर प्रयत्न होत आहेत. कोरोना वाढत असताना डिजिटल व्यासपीठांवरून जनजागृती सुरू आहे. 
- अमृता जोशी, समुपदेशक, "हितगुज' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com