कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानासाठी निधी उपलब्ध करून देऊ : क्रीडा मंत्री अदिती तटकरे 

meri weather ground kolhapur aditi tatkare ruturaj patil
meri weather ground kolhapur aditi tatkare ruturaj patil

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनच्या मेरी वेदर मैदान वरील मंडप दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन राज्याच्या क्रीडा व युवक कल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना दिले. 

कोल्हापूर ही क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते. फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, कबड्डी, नेमबाजी, टेनिस, मॅरेथॉन अशा अनेक खेळांमध्ये कोल्हापुरातील खेळाडूंनीही देशपातळीवर आणि आंतराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. सुमारे 40 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनच्या मेरी वेदर मैदानावरील मंडप दुरुस्ती व इतर सोयी-सुविधा उपलब्द करून देण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी राज्याच्या क्रीडा व युवक कल्याणमंत्री ना. आदिती तटकरे यांची भेट घेऊन मेरी वेदरसह शहरातील सर्व मैदाने,क्रीडांगण साठी लागणाऱ्या निधी बाबत चर्चा करून निवेदन दिले. या वेळी मंत्री तटकरे यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

निधी उपलब्ध करून चांगल्या दर्जाचे मैदान होईल तसेच कोल्हापुरातील टेनिस खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्यस्तरीय व देशपातळीवरील स्पर्धा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यासाठी तसेच विविध मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यासाठी हे अद्ययावत टेनिस मैदान महत्वाचे ठरणार असल्याचे आमदार श्री पाटील यांनी या वेळी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com