महसूलमध्ये पाकीटमारीची अशी आहे पद्धत

 This is the method of pocketing revenue
This is the method of pocketing revenue

कोल्हापूर : साहेबांनी आधीच केलेल्या फाईलवरील "सही'चे बाहेरल्या-बाहेर भांडवल करणारे काही कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासह महसूलमधील इतर कार्यालयात दररोजच्या प्रोटोकॉलला सोकावले आहेत. साहेबांना त्याचा थांगपत्ताही नसतो. टेबलवर येणाऱ्या फाईलची चौकशी होते, योग्य फाईलवर सही होते, अयोग्य फाईल परत पाठवली जाते. पण ज्या फाईलवर सही होते, त्याच फाईलवर मोठे पाकीट मिळविण्यासाठी काही कर्मचारी "कदम-कदम बडाये जा, जो भी मिले लुट जा' असे म्हणतच आपल्या कामाचा दिवस ढकलत आहेत. 
कागल प्रांत कार्यालयात काल 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या लिपिकाला रंगेहाथ पकडला. ऐवढी मोठी रक्कम स्वीकारण्याचे फाजील धाडस कर्मचाऱ्यांकडून होत आहे. जिल्हाधिकारी, प्रांत, तहसील, तलाठी, ग्रामसेवक, सर्कल कार्यालयापासून ही पाकिटमारी सुरू आहे. बहुसंख्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी वरिष्ठांनी फाईलवर केलेल्या "सही' पाकिट मिळविण्यासाठीच उपयोग करत आहेत. याची माहिती नसते स्वराज्य भवनमध्येही असाच साहेबांच्या नावाखाली प्रोटोकॉल घेणारे काही कर्मचारी आहेत. वरिष्ठांनी सही केलेली असते, त्यांना हे बहाद्दर संबंधित व्यक्तीला तुझी फाईल आज साहेबांसमोर ठेवणार आहे. त्याचे अमूक ऐवढे पाकीट घेऊन येण्याचा जणू आदेशच दिला जातो. स्वराज्य भवन कार्यालयाच्या पार्किंग मध्ये त्याने आणलेल्या चारचाकीमध्येच पाकिटाचा हिशेब होतो आणि थोड्यावेळाने त्याची फाईल दिली जाते. प्रत्येक कामात यांचा प्रोटोकॉल असतो. 
लोकही माझे काम वेळेत होऊ दे, विरोध केला तर कामात अडकवून ठेवतील, असे म्हणून गप्प राहतात, संबंधित कर्मचाऱ्याचा हातावर पाकीट ठेवतो आणि निघून जातो. 

अधिकाऱ्यांनी शोध घेण्याची गरज 
साहेबांच्या नावाखाली खिसे भरणाऱ्यांचा शोध आता वरिष्ठांना घ्यावा लागणार आहे. कारण जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात येणाऱ्या फाईलवर रितसर सही होत असेल आणि त्याचे कर्मचाऱ्यांकडून भांडवल केले जात असेल तर लोकांची लुबाडणूक आणि वरिष्ठांची बदमानी करण्यातला हा प्रकार आहे. येथील एक कर्मचाऱ्याने तर "ताळ' सोडला आहे. परवाना देण्यासाठी आलेल्या फाईंलमध्ये मोठे पाकीट मिळते. पूर्वीपासून तो हेच करतो.

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com