...तर कोरोनाचा मृत्यूदर कमी होईल ! 'या' मंत्र्यांनी सांगितला उपाय 

Minister Hassan Mushrif inaugurates Corona Ward
Minister Hassan Mushrif inaugurates Corona Ward

कागल - कोरोनासदृश्‍य लक्षणे आढळताच तपासणी अहवालाची वाट न पाहता रुग्णावर उपचारास सुरुवात करा. त्याचबरोबर घरोघरी स्क्रीनिंग करून अँटिजन टेस्टची संख्याही वाढवा. याची गांभीर्याने अंमलबजावणी केल्यास कोरोना मृत्यूदर कमी होईल, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. येथील शासकीय बहुउद्देशिय सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. 

दरम्यान, कोरोना केअर सेंटर येथील नवीन कोरोना वार्डचे उद्‌घाटनही मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. या वेळी सभापती विश्वास कुराडे, उपसभापती दीपक सोनार, जिल्हा परिषद सदस्य शिवानी भोसले उपस्थित होते. 

कोरोनाचे वाढते रुग्ण आणि मृत्यूदर याविषयी चिंता व्यक्त करून मुश्रीफ म्हणाले, ""कोवीड केअर सेंटरमध्ये नव्याने उभारलेल्या हॉलमध्ये 85 बेडची सोय होणार आहे. यापैकी 15 बेड ऑक्‍सिजनचे असतील. उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी पिण्याचे शुद्ध थंड - गरम पाणी व आठ गरम पाण्याच्या किटल्या, फॅन, आंघोळीसाठी गिझरसह दोन बाथरूम, आठ शौचालये याबरोबरच या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना पीपीइ किट बदलण्यासाठी वेगवेगळी कंपार्टमेंट अशा सुविधा निर्माण केल्या आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणा, खासगी वैद्यकीय तज्ज्ञ जीवावर उदार होऊन कोरोनाविरुद्ध संघर्ष करत आहेत. त्यांच्या कार्याला सलामच करावा लागेल.'' 

प्रांताधिकारी रामहरी भोसले म्हणाले, ""तालुक्‍यात आतापर्यंत 336 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यातील 152 रुग्णांवर उपचार सुरू असून 171 बरे झाले तर 13 जणांचा मृत्यू झाला.'' 
तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, डॉ. सुनिता पाटील, मुख्याधिकारी पंडित पाटील, संजय गायकवाड, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 

तालुका प्रशासन सज्ज 
तालुक्‍यात कागल शहरातील 6, मुरगूड 4 तर दौलतवाडी, बेलेवाडी काळम्मा व बोरवडे येथील प्रत्येकी एक असे 13 बाधित मृत झाले आहेत. तालुक्‍यातील 17 खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड कोरोनासाठी आरक्षित आहेत. मदतीसाठी तीन मोबाईल क्रमांकही 24 तास उपलब्ध आहेत. 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com