फुटबॉल स्पर्धेत मिरज, बेळगाव, सोलापूर उपांत्य फेरीत

Miraj, Belgaum, Solapur in the semifinals at the Gadhinglaj's football tournament Kolhapur Marathi News
Miraj, Belgaum, Solapur in the semifinals at the Gadhinglaj's football tournament Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे चॅम्पस्‌ ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेला सुरवात झाली. मिरज फुटबॉल स्कूल, बेळगाव विजेता अकादमी, सोलापूर एसएसआय आणि निपाणी फुटबॉल ऍकॅडमीने आपापल्या गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली. बारा वर्षांखालील स्पर्धेत स्थानिक संघांचे आव्हान संपुष्टात आले. म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावरील या स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला आहे. 

उपनगराध्यक्षा शकुंतला हातरोटे यांनी स्पर्धेचे उद्‌घाटन केले. पुट्टू रायकर, किशोर सुतार, युनायटेडचे अध्यक्ष अरविंद बारदेस्कर, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद, संभाजी शिवारे, गौस मकानदार, अशिष पाटील, अभिजित चव्हाण उपस्थित होते. रितेश बदामे यांनी स्वागत केले. सुरज हनिमनाळे यांनी आभार मानले. 

अ गटात सोलापूरने दोन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. सावित्रीबाई फुले विद्यालय व वि. दि. शिंदे हायस्कूलला प्रत्येकी चार गोलने पराजित केले. सोलापूरच्या मेघराज म्हेत्रे, कृष्णहंग रचवाला, आर्थो देवदास यांनी प्रत्येकी दोन तर ऋषिकेश मेढे, आशुतोष जोशीने प्रत्येक एक गोल करुन विजयात वाटा उचलला. फुले आणि शिंदे प्रशालेला एकही विजय मिळविता आला नाही. ब गटात अपेक्षेप्रमाणे विजेता फुटबॉल ऍकॅडमीने नवख्या क्रिएटीव्ह स्कूल आणि सर्वोदया स्कूलला हरवून गटात अव्वल स्थान मिळविले. बेळगावचा आदम खान, गौरव गोडवामी, शशांक वेर्णेकर, अतुल किल्लेदार यांनी दोन तर अस्लम मुल्ला, गौरांग उचकाई यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाला उपांत्य फेरीत पोचविले. 

"क' गटात मिरज फुटबॉल स्कूलने साधना प्राथमिकला दोन, तर शिवाजी विद्यालयावर तीन गोल करून वर्चस्व राखले. मिरजेच्या चेतन कांबळे, राजवीर देसाई, आरमान टोमले यांनी प्रत्येकी दोन गोल करुन बहारदार खेळ केला. ड गटात निपाणी फुटबॉल ऍकॅडमीने साधना माध्यमिकला दोन तर नवोदित गडहिंग्लज हायस्कूलला सात गोलने पराभूत करुन अव्वल स्थान मिळविले. निपाणीच्या योगेश भजिया याने हॅटर्ट्रीक केली. आर्थव साळवे, आयुष चव्हाण, अदित्य तांबट यांनी प्रत्येकी दोन गोल करुन त्याला साथ दिली. 

सामनावीर मानकरी.. 
कृष्णरंग रणवाळे, मेघराज म्हेत्रे, स्वयंम मोरे, शशांक वेर्णेकर, गौरव उचकर, युवराज बिलावर, आरमान टोमले, चेतन कांबळे, मानतेश अनावरे, योगेश भजिया यांनी सामनावीर म्हणून क्रीडा साहित्य देऊन गौरविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com