मिरज-लोंढा दुपदरीकरणाचे काम गतिमान; पुढील वर्षी होणार पूर्ण

Miraj Londha duplication work in progress next year
Miraj Londha duplication work in progress next year

बेळगाव - मिरज-लोंढा रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम पुन्हा गतिमान झाले आहे. कोरोना काळात हे काम बंद ठेवण्यात आले होते. सुमारे तीन वर्षापासून दुपदरीकरणाचे काम सुरु असून ते पाच वर्षांत म्हणजेच 2021-22 अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. 

लोंढा ते मिरजदरम्यान सात टप्प्यात हे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या घटप्रभा ते चिक्‍कोडी रोडपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. यावरुन रेल्वे धावत आहेत. सध्या इतर सहा टप्प्यातील कामे सुरु असून इतर ठिकाणीही कामे गतीमान झाली आहेत. या दरम्यान ब्रिजची कामे पूर्णत्वाला आली आहेत. लॉकडाउनमध्ये बंद असलेल्या कामाला पुन्हा गती देण्यात आली असून रेल्वे रुळ, खडीकरण, केबल जोडणी आदी कामे सध्या सुरु आहेत. मिरज ते लोंढा दरम्यान विजयनगर, शेडबाळ, उगार खुर्द, कुडची, चिंचली, रायबाग, चिक्‍कोडी रोड, बागेवाडी, घटप्रभा, गोकाक, परकनट्टी, सुळधाळ, सुळेभावी, पाच्छापूर, सांबरा, बेळगाव, देसूर, खानापूर, लोंढा ही रेल्वेस्थानके येतात. या दरम्यान असलेल्या काही रेल्वे स्थानकांचाही सध्या विकास केला जात आहे. 

पुणे-मिरज-लोंढा या 466 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला 2004 साली तत्कालिन रेल्वेमंत्री नितीशकुमार यांनी हिरवा कंदील दिला होता; पण 2016 मध्ये निधीची तरतूद करुन या प्रकल्पासाठी 3,627,47 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मिरज ते लोंढा अंतर 186 किमी आहे. सध्या एकेरी रुळ असल्याने क्रॉंसिंगसाठी रेल्वेचा 20 ते 30 मिनिटे स्थानकावर थांबावे लागते. दुपदरीकरण झाल्यानंतर न थांबता रेल्वे धावणार आहे. दुपदरीकरणामुळे मिरज ते लोंढा रेल्वे प्रवास दोन तासांचा तर मिरज ते बेळगाव प्रवास सव्वा ते दीड तासांचा होणार आहे. धारवाड-बेळगाव ते मिरज या मार्गावर सुमारे तीसपेक्षा अधिक रेल्वे धावतात. सध्या मिरज व लोंढ्यात जंक्‍शन असून बेळगाव ते कुडची आणि कुडची ते बागलकोट असा नवीन रेल्वेमार्ग तयार होऊ लागल्याने भविष्यात कुडची जंक्‍शन म्हणून विकसीत होणार आहे. 
 

"पुणे-मिरज-लोंढा असे दुपदरीकरण हाती घेण्यात आले आहे. पुणे ते मिरजेपर्यंत अडचणी येत होत्या. संबंधीत अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्या अडचणी दूर केल्या आहेत. सध्या मिरज ते लोंढापर्यंत काम गतीने सुरु आहे. काही टप्प्यातील काम पूर्ण झाले असून त्यानंतर बेळगावपासून हुबळी-होसपेट ते बंगळूरपर्यंत काम हाती घेतले जाईल.'' 
- सुरेश अंगडी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री 
 

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com