तळंदगेत अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महिला सरपंचासह पथकावर जमावाने केला सशस्त्र हल्ला...

mob attacked on woman sarpanch and staff inTalandage kolhapur
mob attacked on woman sarpanch and staff inTalandage kolhapur

हुपरी - ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महिला सरपंचासह कर्मचाऱ्यांच्या पथकावर जमावाने सशस्त्र हल्ला करण्याची घटना तळंदगे (ता.हातकणंगले) येथे आज सकाळी घडली. हल्ल्यात सरपंच पतीसह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण झाली. त्यामध्ये सरपंच पतीसह कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, हल्लेखोरांना तातडीने अटक होऊन कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तळंदगे गाव बेमुदत बंद तसेच ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

तळंदगे येथील प्राथमिक मराठी शाळे लगत असलेल्या सि.स.क्रमांक 334 या जमिनीवर गेल्या काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायती तर्फे मैदान तयार करण्यात आले आहे. ग्राम पंचायतीने मैदाना भोवती सिमेंटचे खांब व तार मारुन कंपाउंड घातले आहे. त्याठिकाणी अतिक्रमण करण्यासाठी काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. यासंदर्भात ग्रामपंचायती तर्फे हुपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.10) रितसर तक्रार देखिल देण्यात आली होती.

दरम्यान, खानू बिरू शिनगारे यांने काल शनिवारी लोखंडी पत्रे व लाकडी बांबू मारून शेड मारण्याचा प्रकार केला. सदरचा प्रकार समजताच सरपंच सौ.जयश्री भोजकर या सहकारी सदस्य उदय कांबळे, महेश कांबळे व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह अतिक्रमण काढण्यासाठी सकाळी साडे नऊ च्या सुमारास गेल्या. अतिक्रमण काढत असता खानू शिनगारे व त्याच्या साथीदारांनी अचानक हातात काठ्या, कुऱ्हाडी, विळे व कोयता घेऊन पथकावर हल्ला चढवला. यावेळी पथकाच्या दिशेने दगडफेकही करण्यात आली. त्यावेळी एकच गोंधळ उडाला. दरम्यान, काहींनी अडवाअडवी करण्याचा प्रयत्न केला.

हल्ल्यात दगड तसेच काठ्यांचा मार लागल्याने सरपंच जयश्री भोजकर यांचे पती संजय भोजकर यांच्यासह पाणी पुरवठा कर्मचारी संजय शिंगे वाहनचालकच स्वप्निल शिंदे, शिपाई शरद कोळेकर, उत्तम शिंदे, पोपट कासार, राजु जमादार आदी कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी हुपरी पोलीसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com