भरदिवसा पर्समधून मोबाईल लंपास 

mobail thef in kolhapur
mobail thef in kolhapur

कोल्हापूर - शहराच्या मध्यवतीतील शिवाजी पेठेतील घरातून व बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्समधून असे तीन मोबाईल चोरट्याने हातोहात लांबवले. याची नोंद जुना राजवाडा, लक्ष्मीपुरीसह शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, शिवाजी पेठेतल्या घरच्या उघड्या दरवाज्यातून गुरुवारी भरदिवसा चोरट्याने आत प्रवेश करून 15 हजार रूपये किमंतीचा मोबाईल लंपास केला. याची नोंद जुना राजवाडा पोलिसात झाली. याबाबतची तक्रार आकाश रंगराव अस्ले यांनी दिली. लुगडी ओळ येथून रुकडी माणगांव बसमध्ये बसणाऱ्या महिलेच्या सॅगमधील आठ हजाराचा मोबाईल चोरट्याने हातोहात लंपास केला. हा प्रकार 7 जानेवारीला सायंकाळी घडला. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसात झाली.

याबाबतची तक्रार स्नेहल लोहार यांनी दिली. दरम्यान दाभोळकर सिग्नल येथील बस थांब्यावरून प्रवास करणाऱ्या महिलेचा सात हजार रूपये किमंतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला. हा प्रकार 13 जानेवारीला सायंकाळी घडला. याची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली. याबाबतची तक्रार आरती साखळकर यांनी दिली. 
 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com