मुहूर्तावर सोन्याला मिळाली ऑनलाईन झळाळी

प्रतिनिधी
Monday, 27 April 2020

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तही कोणत्याही खरेदीशिवाय वाया जाणार, असेच चित्र काही दिवस होते. एरवी गर्दीने गजबजून जाणाऱ्या गुजरीत ऐन मुहूर्तावर एकाच महिन्यात सलग दुसऱ्यांदा पूर्णपणे शुकशुकाट अनुभवायला मिळाला. त्याशिवाय इलेक्‍ट्रॉनिक, रिअल इस्टेट, हेल्थ इक्वीपमेंटस्‌, गारमेंटस्‌ अशा सर्वच क्षेत्रात हीच स्थिती कायम होती. मात्र, सोन्याच्या ऑनलाईन बुकिंगने एकूणच बाजारपेठेला मात्र थोडासा दिलासा मिळाला.  

 

कोल्हापूर,ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त कोरडाच जाणार, अशी धाकधूक असताना आज मात्र सोन्याला गुंजभर का होईना, ऑनलाईन झळाळी मिळाली. देशभरातील लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र ऑनलाईन दागिने बुकिंग झाले. परंतु, कोल्हापूरचा विचार केला तर येथील ग्राहकांनी विशिष्ट वजनाचे सोने बुक केले आणि ऑनलाईन व्यवहारही केले. यानिमित्ताने आजच्या सोन्याच्या दरानुसार सोने बुकिंग झाले असून, लॉकडाऊननंतर संबंधित ग्राहक त्यांना हवा तो त्या-त्या वजनाचा दागिना घेणार आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातही व्हेईकल बुकिंगचा मुहूर्त काहींनी साधला. दरम्यान, गेली महिनाभर गुढी पाडव्याच्या मुहूर्तासह पूर्णपणे ठप्प झालेल्या बाजारपेठेत आजच्या मुहूर्तावर मात्र काही अंशी का होईना व्यवहारांना प्रारंभ झाला. 
लॉकडाऊनमुळे सराफ कट्ट्यासह सर्वच प्रमुख बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तही कोणत्याही खरेदीशिवाय वाया जाणार, असेच चित्र काही दिवस होते. एरवी गर्दीने गजबजून जाणाऱ्या गुजरीत ऐन मुहूर्तावर एकाच महिन्यात सलग दुसऱ्यांदा पूर्णपणे शुकशुकाट अनुभवायला मिळाला. त्याशिवाय इलेक्‍ट्रॉनिक, रिअल इस्टेट, हेल्थ इक्वीपमेंटस्‌, गारमेंटस्‌ अशा सर्वच क्षेत्रात हीच स्थिती कायम होती. मात्र, सोन्याच्या ऑनलाईन बुकिंगने एकूणच बाजारपेठेला मात्र थोडासा दिलासा मिळाला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At the moment, gold got an online spark