ब्रेकिंग -कोल्हापुरात दिवसभरात ३७ जणांना कोरोनाची लागण  

शिवाजी यादव 
रविवार, 12 जुलै 2020

दहा कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर आहे. काल दिवसभरात २५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या.

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज सकाळी दोन, दुपाली १७ जण पाॅझिटिव्ह आल्यानंतर आता आलेल्या आहवालानुसार आणखी १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज दिवसभरात ३७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या ३७ जणांसह जिल्ह्यातील कोरोना रग्णांची संख्या आता १२१८ वर पोहोचली आहे. १२१८ मधील दहा कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर आहे. काल दिवसभरात २५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यांची संख्या आता ८३५ झाली आहे. 

आता पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये कोल्हापूर शहर सहा, इचलकरंजीचे दहा, शिरोळ एक तर ओरिसाच्या एकाचा समावेश आहे.

दुपारी पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये कोल्हापूर शहर पाच, इचलकरंजी चार,  गडहिंग्लज तीन, चंदगड दोन,  हातकणंगले एक, शाहूवाडी एक तर करवीरमधील तीघांचा समावेश होता.  

बावडेकरांना कोरोनाची भीती नाही का?
कोरोनाचा संसर्ग अगदी घरापर्यंत येऊन पोहोचला, तरीही नागरिक गांभीर्याने घेत नाहीत अशी परिस्थिती कसबा बावडा येथे दिसून येत आहे. मेन रोडवर पिंजार गल्ली येथे एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लोकांची जमलेली गर्दी पाहता नागरिकांना अजिबात गांभीर्य नसल्याचे लक्षात येते. 

यापूर्वी मराठा कॉलनी येथे बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर प्रतिबंधीत क्षेत्रात जशा पद्धतीने कडक अंमलबजावणी केली होती तसा प्रकार आता बंद झाला आहे. आता सर्व परिसर लॉकडाऊन न करता फक्त संबंधित इमारतीला बॅरिकेड लावण्यात आले आहेत. पण यामुळे नागरिकांना या घटनेचे गांभीर्य लक्षात आले नाही व मेन रोडवर नागरिकांची अनावश्यक ये-जा सर्रास सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हे पण वाचा -  धक्कादायक : ट्रॅकिंगला चकवा देत कोल्हापुरात अशी होतेय परजिल्ह्यातून इंन्ट्री...

 
घोळक्याने एकत्र येणे, विनामास्क गाडी चालवणे, गाड्या लावून गप्पा मारणे, सोशल डिस्टसिंगचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणे, रस्त्यावर कुठेही थुंकणे आदी प्रकार या भागात सर्रास पहायला मिळत आहेत.
 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more 18 corona positive cases in kolhapur district